IMPIMP

Raj Thackeray | ‘सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय’ – राज ठाकरे (व्हिडीओ)

by bali123
BJP-MNS Alliance | no alliance with bjp in pune municipal elections says MNS Chief raj thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन केंद्र सरकारनेही दहीहंडी आणि गणेशोत्सव सणासाठी निर्बंध लागू केल्याबाबत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, मला वटतंय की, या सगळ्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बर चाललंय. कारण कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरत नाही. कोणती झंझटच नसल्याने आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा असेच एकंदरीत धोरण आहे, असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र (Central) आणि राज्य सरकारवर (Maharashtra Government) गंभीर आरोप केले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नवी पेठेत (navi peth pune) आयोजित केली होती. त्यापूर्वी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महापालिकेचा कारभार ताब्यात घेण्याचा कट

राज्यात महापालिका निवडणुका (Municipal election) न घेता त्याठिकाणी प्रशासक (Administrator) नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात घेण्याचा कट सरकर आखत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका राज्य सरकारलाच नको आहेत. हे सरकारच्या फायद्याचे असेल. असं नको व्हायला. जर निवडणुका झाल्या नाहीत तर महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच सर्व काही बघणार. हे सगळे उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) विषय पुढे करुन सरकार काही तरी साध्य करतेय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

सरकारकडे सर्व यंत्रणा आहे

ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तो पर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी घेतला आहे. त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. पण हा पाठिंबा देताना, सरकारकडे सर्व यंत्रणा आहे, मनात आणले तर इम्पेरिकल डेटा (Imperial data) गोळा करणे यासह सर्व गोष्टी होऊ शकतात, असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीला स्थगिती देऊन काही होणार नाही, त्याऐवजी केवळ महापालिकांवर प्रशासक नेमून सरकारचा उगीच फायदा व्हायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅमेनिटी स्पेसवर भाष्य करणं टाळलं

पुणे शहरातील 270 अ‍ॅमेनिटी स्पेस (Amenity space) दीर्घकाळ भाड्याने देऊन त्यातून 1752 कोटी रुपये उत्पन्न मिळवले जाणार आहे.
पुणेकरांच्या हक्काच्या जमीनी श्रीमंतांच्या घशात घातल्या जात आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
यावर मनसेची काय भूमिका असणार आहे, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला.
यावर उत्तर देताना माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो आहे, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.

Web Title : Raj Thackeray | government feels good about lockdown raj thackeray

हे देखील वाचा :

Related Posts