IMPIMP

Raj Thackeray | CM उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं राज ठाकरेंकडून स्वागत; म्हणाले – ‘आता कच खाऊ नका..’

by nagesh
Raj Thackeray | mns cheif raj thackeray supports maharashtra government decision to put name plate in marathi on shops

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Raj Thackeray | राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी (12 जानेवारी) रोजी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, परंतु, अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असं देखील सांगण्यात आलं आहे. ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतलेल्या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे. तसेच राज ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाचे अभिनंदन केले. परंतु, आता कच खाऊ नका. या निर्णयाची अंमलबजावणी नीट करा, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज ठाकरे यांनी याबाबत सोशल मिडियावर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ”या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु, 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दुकानांवरील नाम फलक मराठीतच असावेत, असा निर्णय घेतला. तेव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा. आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन.” असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

”सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका.
ह्याची अंमलबजावणी नीट करा.
ह्यात आणखी एक भानगड राज्य सरकारनं करुन ठेवली आहे की मराठी भाषेशिवाय इतर भाषा नाम फलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते.
इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका.” असं देखील राज ठाकरे म्हणाले.

Web Title :-  Raj Thackeray | mns cheif raj thackeray supports maharashtra government decision to put name plate in marathi on shops

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘पवारांची मुख्यमंत्री व्हायची तयारी चाललीय का ?’ – चंद्रकांत पाटील

Skin Care In Winter | ‘ही’ गोष्ट गुलाब पाण्यात मिसळून लावा, चेहरा चमकेल; तज्ञांनी सांगितले ‘हे’ फायदे

Skin Care Tips | तरुण आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी करा, चेहरा आरशासारखा चमकेल

Related Posts