IMPIMP

Raj Thackeray Pune Sabha | ‘आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?’ मुख्यमंत्री ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत आणि आयोध्या दौर्‍यापासून ते MIM बद्दलचे राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे

by Team Deccan Express
Raj Thackeray Pune Sabha | 'Are you selling our true Hindutva, its false, washing powder?' From Chief Minister Uddhav Thackeray to Sharad Pawar and from Ayodhya tour to MIM, 10 important points in Raj Thackeray's speech

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Raj Thackeray Pune Sabha | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आज (रविवार) पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात (Ganesh Kala Krida Manch Hall) सभा घेतली. या सभेत चौफेर फटकेबाजी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune Sabha) यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. अयोध्या दौऱ्याबाबत (Ayodhya Tour) सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), एमआयएमवर (MIM) जोरदार हल्लाबोल केला.

पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी विरोध केला होता. यावर भाष्य करताना राज ठाकरे (Raj Thackeray Pune Sabha) म्हणाले, मी माफी मागावी याची मागणी केली, त्यांना आता 12-14 वर्षानंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये (Gujarat) अल्पेश ठाकूर (Alpesh Thakur) नावाच्या नेत्यानं यूपी (UP), बिहारच्या (Bihar) लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. यांना आपलं हिंदुत्व (Hindutva) झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, असंही ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे

1. अयोध्या दौऱ्याचा विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या (Babri Masjid Demolition) वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं.

2. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्या मागे ससेमिरा लावला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही.

3. मी माफी मागावी याची मागणी केली, त्यांना आता 12-14 वर्षानंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी, बिहारच्या लोकांना हकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार.

4. ऐन निवडणुकीच्या (Election) वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवणुकीला इथं कुणीच नसतं. माझी महाराष्ट्रातील ताकद हकनाक तिकडं सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही.

5. राणा दाम्पत्य (Rana Couple) मातोश्रीवर (Matoshri) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणायला जाणार होते. मातोश्री काय मशीद (Mosque) आहे का ? मोठा गोंधळ, आरोप प्रत्यारोप झाले. एवढा गोंधळ होऊन संजय राऊत (Sanjay Raut) आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत.

6. आपल्या सभेला हॉल परवडत नाही, पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी एस.पी. कॉलेज (S.P. College) मिळतंय का विचारलं होतं. त्यानंतर त्यांनी देत नसल्याचं सांगितलं त्यामुळे आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदी पात्रातील सभेचा विषय सुरु होता, पावसाची (Rain) शक्यता होती, काल मुंबईतही पाऊस सुरु होता. सध्याचे पावसाळी हवामान (Rainy Weather) पाहता पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं?

7. मला वाटतं औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangzeb Tomb) एमआयएमचा (MIM) माणूस गेल्यावर महाराष्ट्र खवळेल. पण महाराष्ट्र थंडच. ज्याचा कोथळा शिवछत्रपतींनी बाहेर काढला. त्याची एवढीशी कबर प्रतापगडाच्या (Pratapgad) पायथ्याशी बघून या. त्याचा विस्तार आज 15 ते 20 हजार फुटात झालाय. अफजलखानाची मशीद तिथे उभी राहिली आहे. त्यासाठी फंडिंग येतंय. हे फंडिंग देणाऱ्या अवलादी कोण आहेत? कारण आम्ही शांत बसलो आहोत.
आम्हाला कसलंही देण-घेणं नाही. आम्ही लोण्याचे थंड गोळे आहोत.

8. मागील सभेत मी म्हणालो होतो की, पंतप्रधानांना विनंती आहे की लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून एक कायदा आणावा आणि तिसरी विनंती म्हणजे औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजीनगर नामकरण करावं. यांचं राजकारण एकदा मोडीतच काढा. यांच्या राजकारणासाठी हिंदु-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. एमआयएम सतत हिंदू विरोधात बोलत राहिली पाहिजे. ज्यातून यांची रोजीरोटी चालले. यांच्या लक्षात आलं नाही की आपण एक राक्षस वाढवतोय. म्हणता म्हणता त्यांचा राजकारणात खासदार झाला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करुन दिली.

9. मुख्यमंत्र्यांची सभा झाली काय पोरकटपणा चालू आहे मला कळत नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व.
वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीज से सफेद कैसे? प्रश्न रिझल्टचा आहे. जे आम्ही देतो.

10. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे.
प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून चालणार नाही.
काल शिवसेनेला (Shivsena) कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे पाहिलं असत.
तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतात, आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो.
तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेना कळत नाही की तुम्ही कुणासोबत राहताय.

Web Title :- Raj Thackeray Pune Sabha | ‘Are you selling our true Hindutva, its false, washing powder?’ From Chief Minister Uddhav Thackeray to Sharad Pawar and from Ayodhya tour to MIM, 10 important points in Raj Thackeray’s speech

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts