Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

by pranjalishirish
raju shetty think world crooked faces dont lock down raju shetty chief-minister

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी  Raju Shetty यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. ‘करपलेल्या चेहऱ्यांच्या संसाराचा विचार करा, जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा पण लॉकडाऊन लावू नका’, असे ते म्हणाले.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असताना ही साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याच्या दृष्टीने घडामोडी सुरु आहेत. त्यानंतर आता राजू शेट्टी Raju Shetty  यांनी ट्विट करून यावर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय, वाढलेली महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर यामुळे कंबरड मोडले आहे. या माझ्या करपलेल्या चेहऱ्यांच्या संसाराचा विचार करून त्यांचं जगणं सुसह्य करा’.

‘या’ कारणामुळं मोदींनी Lockdown लावला होता, आशिष शेलारांनी दिलं महाविकासला प्रत्युत्तर

तसेच राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी, उद्योजक, दुकानदार, शेतमजूर, व्यापारी यांचे कर्जाचे हप्ते, घरगुती व शेतीपंपाचे लाईट बिल, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, वाढलेली महागाई यामुळे कंबरडे मोडले आहे. आमचं जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, पण राज्यात लॉकडाऊन लावू नका, असेही शेट्टी Raju Shetty  म्हणाले.

‘ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू हे महावसुली सरकारच्या अनास्थेतून’, भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल (व्हिडीओ)

अन्नधान्य वाटपासंदर्भात सरकारकडून विचार

मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी सोमवारी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढवून ती अधिकाधिक लोकांना मिळेल याची व्यवस्था करणे, रेशन दुकानांतून तांदूळ, गव्हासोबतच डाळी, साखर, तेलाचाही पुरवठा करण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती दिली जात आहे.

Read More : 

‘Facebook Live वर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आता तरी काही बोलतील का ?, भाजपचा सवाल

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

Related Posts

Leave a Comment