IMPIMP

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

by bali123
Ramdas athavle |  minister ramdas athavle speaks ncp leader sharad pawar president obc senses needed

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Ramdas athavle | केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले (Union Ministe Ramdas Athavale) हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी विविध घडामोडीं संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शरद पवार  (Sharad Pawar) हे देशाचे नेते आहेत ते धोकेबाज नाहीत. पवार हे राष्ट्रपतिपदाचे (NCP) उमेदवार असतील तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नये, असे त्यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आठवले म्हणाले, जातनिहाय जनगणना झाल्याने जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. जातनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचे हे नेमकेपणाने ठरविता येईल. ओबीसी समाजाची (OBC Society) जनगणना (Census) आवश्यक आहे. यापूर्वी जो ओबीसींचा डाटा तयार केला आहे तो अंजानुसार आहे. त्यामुळे केंद्र सरकार ( Central Government) तो डाटा देत नसल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे सरकारमध्ये ( Uddhav Thackeray Government) शरद पवार यांच्यामुळे ताळमेळ नाही. शिवसेनेला जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न साकार करायचे असल्यास त्यांनी भाजपसोबत यावे. आमदार फुटतील या भीतीने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगत राज्याला मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) अधिकार देण्यासाठी संसदेने ठराव मंजूर करावा,
अशी मागणी आम्ही केली आहे असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

Web Title : Ramdas athavle |  minister ramdas athavle speaks ncp leader sharad pawar president obc senses needed

Related Posts

Leave a Comment