IMPIMP

Ramdas Kadam | अनिल परब आणि रामदास कदम यांच्या वादात शिवसेना मध्यस्थी करणार? कदमांची आमदारकी जाणार?

by nagesh
Ramdas Kadam | ramdas kadam attacks anil parab over party issue kokan ask party chief uddhav thackeray look it

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Ramdas Kadam | महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यापासुन राज्यात भाजप (BJP) विरुद्ध महाविकास आघाडीत अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजप पक्ष आघाडीच्या मंत्र्यावर अनेक गंभीर आरोप करताना दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तर ईडीच्या रडारवर असणारे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याबाबत आणखी ट्विस्ट माहिती समोर येत आहे. तर शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अनिल परब यांच्या मालमत्ता संदर्भातची कागदपत्रे किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कदम यांनी सोमय्यांना मदत केल्याची एक ऑडिओ क्लिप (Audio clip) नुकतीच व्हायरल झाली आहे. यामुळे आता शिवसेनेत (Shiv Sena) चर्चा रंगल्या आहे. यामुळे आता अनिल परब यांच्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याची ऑडिओ क्लिप प्रसारीत झाल्यानंतरही या वादाच्या भोव-यात शिवसेना पडणार नसल्याचं समजतंय.
कारण अनिल परब (Anil Parab) आणि रामदास कदम यांच्यातला वाद हा जुना आहे.
या दोघांचा वाद म्हणजे रामदास कदम यांचं भाऊ सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.
रामदास कदम आणि सदानंद परब यांच्यात साहचर्यं नसल्याने या अनिल परब आणि कदम यांच्यात शत्रुत्त्व निर्माण झालं आहे. असं सुत्राकडून सागण्यात आलं आहे.
तर, दापोलीतल्या मुरुड येथे हॉटेल साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं आहे. त्या रिसॉर्टचं कामकाज सर्व सदानंद कदम बघतात. त्या रिसॉर्ट प्रकरणावरच सोमय्यांनी आरोप केले आहेत.

रामदास कदम यांनी ‘तो आवाज माझा नाहीच, याआधीही अशा ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. आमच्याच मुख्यमंत्र्यांला खाली उतरवण्याचे पाप मी कधीच करणार नाही’. असं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, हे ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
अशी ही क्लिप पहिल्यांदाच आलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा माझ्या आवाजात अशा क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या. याबाबत मी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
संजय कदम (Sanjay Kadam) आणि वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) हे दोघेही शिवसेनेत होते.
दोघांनी माझ्या हाताखाली काम केलं. दोघांनी शिवसेनेशी बेईमानी करून निघून गेले.
माझ्या भगव्या झेंड्याशी बेईमानी केली आणि गद्दारी केली आता त्यांना काळजी वाटत आहे.
तसेच, प्रसाद कर्वे हा माझा पीए नाही. तो एक हा सामाजिक कार्यकर्ता आहे.
त्याच्या सर्व पक्षांसोबत संबंध आहे. माझं त्यांचं असं काही बोलणं झालं नाही. असं रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रामदास कदम यांचा एक मुलगा योगेश कदम (Yogesh Kadam) हे दापोलीचे आमदार आहेत. तर दुसरा मुलगा युवा सेनेत सक्रिय आहे.
तर रामदास कदम स्वतः विधान परिषदेवर आमदार आहेत. रामदास कदम हे अनेक वर्षापासून शिवसेनेत आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई न करता कालांतराने कारवाई केली जावू शकते. तसेच विधान परिषदेची मुदत 1 जानेवारी 2022 ला संपते.
दरम्यान अनिल परब यांच्याबाबत व्हायरल क्लिपमुळे कदम यांचे सदस्यत्व जावू शकते. अशी चर्चा आहे.

Web Title : Ramdas Kadam | Will Shiv Sena mediate in the dispute between Anil Parab and Ramdas Kadam? Steps to go to the legislature?

हे देखील वाचा :

Ajit Pawar | पुणे, नाशिकच्या सुरक्षिततेसाठी नगर जिल्ह्यात लाॅकडाउनचा निर्णय

Pune Crime | नोकरी गेल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नंतर स्वत:वर वार करुन तरुणानं आपलं जीवन संपवलं

Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा बॅडमिंटन प्रशिक्षकाकडून ‘विनयभंग’

Related Posts