IMPIMP

Raosaheb Danve | युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी चालतील का?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

by nagesh
Raosaheb Danve | bjp leader and union minister raosaheb danve criticized to uddhav thackeray on shivsena and bjp together

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन Raosaheb Danve | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आज औरंगाबाद (Aurangabad) येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यासपीठावरील उपस्थित भाजपा नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क चर्चा होत आहेत. भविष्यात एकत्र ओलो तर भावी सहकारी असा भाजपा नेत्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. यावरुन आता रावसाहेब दानवेनींही (Raosaheb Danve) प्रतिक्रिया दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीवर आलेल्या अनुभवावरुनच त्यांनी असं विधान केलं असावं, असं दानवे यांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर काँग्रेसचे नेते खूप त्रास देतात… एकदा आपण बसून बोलू असं मुख्यमंत्री कानात म्हणाल्याचं देखील दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दरम्यान, कार्यक्रमावेळी व्यासपीठावर असलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातून मुख्यमंत्री असं म्हणाले असावेत, असं म्हटलं जातंय.

येत्या काळात शिवसेना-भाजपा (Shiv Sena-BJP) पुन्हा युती झाली तर राज्यात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे चालतील का? अशा विचारलेल्या प्रश्नांवरही दानवेंनी उत्तर दिलं आहे.
आधी सगळं जमून येऊ देत. मग पुढे चर्चा होत राहतील. शिवसेना आणि भाजपा पूर्व मित्र होते.
आता पुन्हा मित्र होण्याची शक्यता आहे, असं देखील दानवे यांनी म्हटलं आहे.
तसेच, शिवसेना आमचा समविचारी पक्ष आहे.
त्यामुळे शिवसेनेनं युतीचा विचार केला तर निश्चितच भाजपा त्याचं स्वागत करेल, असं देखील रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी स्पष्ट केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Raosaheb Danve | if bjp sena come together will uddhav thackeray chief ministe raosaheb danve comment

हे देखील वाचा :

FIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल

Anil Deshmukh | ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचे नाव नाही?; सचिन वाझेसह 14 आरोपी

Mumbai Crime | वयोवृद्ध आईवडिलांची छळवणूक ! मुलाला 10 दिवसात अलिशान घर सोडण्याचे कोर्टाचे निर्देश

LIC Saral Pension Yojana | केवळ 1 वेळा प्रीमियम भरल्यानंतर आयुष्यभर मिळतील 12000 रुपये, LIC च्या ‘या’ प्लानमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या

Related Posts