IMPIMP

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

by Team Deccan Express
NCP | NCP maharashtra canceled all planned programs ncp background corona information nawab malik

इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील भोर पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी बंडखोरी करत अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता बंडखोरी करणाऱ्या या सदस्यांची राष्ट्रवादी ncp काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

भोर सभापतिपदाची निवडणुक 18 फेब्रुवारी रोजी पार पडली होती. या निवडणुकीपूर्वी भोर तालुक्यातील राष्ट्रवादी ncp काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 16 फेब्रुवारीला झाली होती. या बैठकीला उपस्थित न राहिल्याने व बंडखोरी करत पक्षशिस्तीचा भंग केल्याने सभापती दमयंती जाधव व माजी सभापती श्रीधर किंद्रे यांच्यावर राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचे पत्र गारटकर यांनी जारी केले. त्यामध्ये म्हटले, की ‘दोन्ही सदस्यांना पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, सदर बैठकीस हे दोघेही अनुपस्थित होते. या बैठकीत पंचायत समिती सदस्य लहू शेलार यांचे नाव सभापतिपदासाठी निश्चित केले होते. त्याप्रमाणे लहू शेलार यांच्या नावे पक्षाचा व्हीप तयार करुन 18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी ncp काँग्रेस पक्षाच्या सर्व पंचायत समिती सदस्यांना तालुका अध्यक्ष घोरपडे यांनी बजावला’.

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

तसेच त्यावर सर्व सदस्यांनी व्हीप स्वीकारल्याच्या सह्या केल्या. पक्ष आदेशाविरुद्ध पाऊल उचलत बंडखोरी करून सभापतिपदासाठी अर्ज भरला आणि त्यांना सूचक म्हणून श्रीधर किंद्रे यांनी पाठिंबा दिला. मात्र, या चारही सदस्यांना झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा मागितला असता सभापती दमयंती जाधव व माजी सभापती श्रीधर किंद्रे यांचा खुलासा योग्य व समाधानकारक वाटला नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Also Read :

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts