IMPIMP

Ring Road in Pune | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! पुण्यासाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर

by nagesh
Ring Road in Pune | provision of rs 1000 crore in supplementary budget from maharashtra Thackeray government for land acquisition of ring road in pune ajit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ring Road in Pune | राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) पुण्यासाठी (Pune News) मोठा
निर्णय घेतला आहे. पुण्यासाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील रिंगरोडच्या (Ring Road in Pune) भूसंपादनासाठी
सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान येत्या मार्चपर्यंत ही तरतूद खर्ची करा,’ असे निर्देश
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) दिले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मार्चपर्यंत संबधित तरतूद खर्ची करा असा आदेश अजित पवार यांनी दिल्याने रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाच्या कामास लवकर सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune And Pimpri Chinchwad) शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने (MSRDC) हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम असे 2 टप्पे आहेत. (Ring Road in Pune)

दरम्यान, पूर्व रिंगरोड मावळ तालुका (Maval), खेड तालुका (Khed), हवेली तालुका (Haveli), पुरंदर तालुका (Purandar) आणि भोर तालुक्यातून (Bhor) जाणार आहे. त्याचबरोबर पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार आहे. हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या आदेशामुळे आता रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाच्या कामास लवकर सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Ring Road in Pune | provision of rs 1000 crore in supplementary budget from maharashtra Thackeray government for land acquisition of ring road in pune ajit pawar

हे देखील वाचा :

Paytm Share Price | सतत घसरतोय पेटीएमचे शेयर, का खाली जाताहेत ‘हे’ स्टॉक, गुंतवणुकदारांनी आता काय करावे

Hemant Birje | बॉलीवूडचे ‘टार्जन’ हेमंत बिर्जेच्या कारला ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर अपघात; बिर्जे व पत्नी जखमी

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात ‘वसुली’साठी ‘चंदननगर’च्या हवालदाराकडून रात्री उशिरा ‘तोडपाणी’ ! महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Related Posts