IMPIMP

Rishikesh Deshmukh | ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर, माजी गृहमंत्र्याचा मुलगा ऋषिकेश अनिल देशमुख अडचणीत?

by bali123
Rishikesh Deshmukh | enforcement directorate investigation reveals shocking information anil deshmukh and son rishikesh may be in trouble

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rishikesh Deshmukh | 100 कोटी वसुलीच्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशमुख यांच्या घरावर काल ईडीने छापे टाकत कारवाई केली आहे. तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि पीए कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना देखील ईडीने (ED) अटक (Arrest) केली आहे. या प्रकरणात सचिन वाझे (Sachin Waze) याने दिलेल्या जबाबात खळबळजनक अन् धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जी माहिती दिली त्यामुळे आता देशमुखांसह त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) हा सुद्धा अडचणीत येणार आहे.Rishikesh Deshmukh | enforcement directorate investigation reveals shocking information anil deshmukh and son rishikesh may be in trouble

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अनिल देशमुखांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले होते. त्यांनी हा पैसा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना दिला होता. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनींच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला हे दाखवायचे होते. एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असे सांगण्यात आले आहे की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता. जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची अन् ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पाहत होता.
इडीने न्यायालयात म्हटले, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटूंबियांच्या थेट मालकीच्या 11 कंपन्या आहेत.
या कंपन्यांची आपआपसात पैशांची देवाणघेवाण होत होती.
पैशांच्या व्यवहाराला काहीही ठोस कारण आढळले नाही.
याचाच अर्थ हा पैसा हेरफार केला जात होता.
यात 4 कंपन्यांचे संचालक असलेल्या विक्रम शर्मा यांनी अशी माहिती दिली की त्यांची कंपनी बनवण्यासाठी ऋषिकेश देशमुख यांनी पैसे दिले होते.

सचिन वाझेंनी काय म्हटले जबाबात

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आपल्याला थेट आदेश मिळत होते.
त्यांनी बार आणि रेस्टॉरंट मालकांची लिस्ट दिली होती.
त्यानुसार डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात 4 कोटी 70 लाख रुपये कुंदन शिंदेंना दिले होते.
देशमुख हे नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत. शिंदे या संस्थेचा सदस्य आहे.
या संस्थेच्या बॅंक स्टेटमेंट पाहिले असता गेल्या काही काळात 4 कोटी 18 लाख रुपये या संस्थेला दिल्लीच्या विविध कंपन्यांकडून मिळाले आहेत.
चौकशीत समोर आले की या कंपन्या फक्त पेपरवर आहेत आणि ट्रान्सफर एन्ट्री करण्याचे काम करतात.

Web Title :-  Rishikesh Deshmukh | enforcement directorate investigation reveals shocking information anil deshmukh and son rishikesh may be in trouble

Related Posts