IMPIMP

Rohini Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला

by nagesh
Rohini Khadse | attack on ncp leader eknath khadse daughter rohini khadse car at jalgaon

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Rohini Khadse | भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे (NCP) घड्याळ हाती बांधलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची मुलगी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या फोरव्हिलर वाहनांवर (Car) अज्ञातांनी हल्ला (Attack On Vehicles) केला आहे. ही घटना काल (सोमवारी) रात्रीच्या दरम्यान घडली आहे. रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना तेथील काही अज्ञातांनी दगडफेक केला. या हल्ल्यामुळे जळगावातील (Jalgaon News) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

2 मोटार सायकलवर आलेल्या 4 अज्ञातांनी रोहिणी खडसे यांच्या वाहनांवर दगडफेक केली. यानंतर त्या अज्ञातांनी परत रॉडने वाहनावर हल्ला केला. यावेळी चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केल्याने रोहिणी खडसे (Rohini Khadse) आणि चालक सुखरूप बचावले. असं खडसे कुटुंबीयांनी सांगितलं आहे. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्या विरोधात आवाज उठविला होता. त्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बोदवड नगरपंचायत निवडणुकीनंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच ‘महिलांना कोणी त्रास देणार असेल तर चोप दिल्या शिवाय सोडणार नाही,’ अस विधान रोहिणी खडसे यांनी केलं होतं. तर ,त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते. दरम्यान आता गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे राजकारण चांगलंच गरम झालं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title : Rohini Khadse | attack on ncp leader eknath khadse daughter rohini khadse car at jalgaon

हे देखील वाचा :

Amit Shah | गुजरातमध्ये 3000 KG ड्रग्ज सापडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime | पुणे पोलिसांकडून धक्कादायक खुलासे ! आरोग्य भरतीचा पेपर ‘न्यासा’ कंपनीतूनही फुटला, पेपरफुटीच्या दोन लिंक; 28 जणांना अटक, 6 कोटींचा मुद्देमाल जप्त

Weak Immunity Symptom | जर तुमचे शरीर देत असेल ‘हे’ 3 संकेत तर समजून जा की इम्यूनिटी होतेय कमजोर; जाणून घ्या

Related Posts