IMPIMP

Rohit Pawar | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या ED चौकशीमागे कुणाचा हात?; पवारांनी केला गंभीर आरोप, म्हणाले…

by nagesh
Rohit Pawar | ncp leader and MLA rohit pawar targets bjp over eknath khadses ed inquiry

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Rohit Pawar | राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आज (शुक्रवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन रोहित पवार यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसमवेत विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या मागे असणा-या ED चौकशीवरुन पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे मोठे नेते आहेत. भाजपमध्ये असतानापासून त्यांची ताकद कमी करण्याचे काम भाजपमधील काही नेत्यांनी केले. आता जळगाव जिल्ह्यात भाजप नेते स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी बहुजन समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांची ताकद कमी करण्याचे काम करीत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच पुढे म्हणाले की, ओबीसी नेत्यांची ताकद कमी करण्याचा एक भाग म्हणजे ईडी चौकशी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

पुढे रोहित पवार म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते पैशांच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गिरीश महाजन यांना पैशांच्या ताकदीचा घमंड असल्याने ते फोडाफोडीच्या राजकारणासाठी त्याचा वापर करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

ED व CBI यंत्रणांकडून होणारी चौकशी हा त्याचाच एक भाग आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर देखील ईडी व सीबीआयच्या अशाच कारवाया सुरू आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई वाढल्या. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर देखील कारवाई केली जात आहे. भाजपने आता हाच दडपशाहीचा मार्ग अवलंबला आहे. असं रोहित पवार म्हणाले.

Web Title: Rohit Pawar | ncp leader and MLA rohit pawar targets bjp over eknath khadses ed inquiry

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवार म्हणाले – ‘साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप’

Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 113 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts