IMPIMP

Rupali Chakankar | ‘देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा

by nagesh
Rupali Chakankar | crime will registred against prime minister narendra modi cheating women ncps rupali chakankars

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rupali Chakankar | पुण्यात (Pune) आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या (Nationalist Congress) वतीने गॅस सिलेंडर दरवाढ व एकूणच महागाईच्या विरोधात दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात आलीत. आंदोलनादरम्यान दोन्ही पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी देशातील महिलांची फसवणूक केल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर गुन्हाच दाखल करायला हवा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

मागील दोन वर्षापासुन कोरोनाच्या महामारीमुळे नागरीत वैतागले आहेत.
अनेकांवर अर्थिक संकट आलं आहे. त्यातच आणखी एक भर म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरच्या वाढणा-या किंमती या पार्श्वभुमीवर पुण्यात आज महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीने रक्षा बंधनाची भेट म्हणून पंतप्रधानांना चक्क गोवऱ्या तर काँग्रेस महिला आघाडीने लाकडं पाठवण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द केली.
निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे (Resident Collector Jayashree Katare) यांच्याकडे पंतप्रधानांना पाठवण्यासाठी म्हणून लाकडाचे तुकडे देण्यात आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उज्ज्वला गॅससारख्या योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली व प्रत्यक्षात मात्र गँसचे दर गगनाला नेऊन भिडवले.
खरे तर देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली.
दर ८-१५ दिवसांनी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वाढवून मोदी देशातील भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी घालत आहेत.
त्यामुळेच आता त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही शेणाच्या गोवऱ्या पाठवत आहोत. असं चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या.

दरम्यान, या आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ,
शहराध्यक्षा मृणालिणी वाणी, तसेच अनिता पवार, पुनम पाटील, भावना पाटील, मीना पवार,
नीता गलांडे, ज्योती सुर्यवंशी, सुनिता डांगे व अन्य महिला सहभागी झाल्या होत्या.
तर काँग्रेस महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले.
शहराध्यक्ष सोनाली मारणे, शर्वरी गोतरणे, छाया जाधव, राजश्री अडसूळ,
संगीता पवार, शिवानी माने अन्य महिला यात सहभागी होत्या.

Web Title : Rupali Chakankar | crime will registred against prime minister narendra modi cheating women ncps rupali chakankars

हे देखील वाचा :

6 लाखाच्या फायद्यासाठी Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; 5 वर्षातच मिळेल मोठा रिटर्न, जाणून घ्या

Pune Crime Branch Police | नागरिकांचे मोबाईल हिसकावणारी दुकली गुन्हे शाखेकडून गजाआड, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Modi Government | 1 ऑक्टोबरपासून कार्यालयाची वेळ होईल 12 तासांची, ‘OT’ चे मिळणार पैसे आणि वाढणार PF, जाणून घ्या नवीन बदल

Related Posts