IMPIMP

Rupali Chakankar | ‘चंद्रकांतदादा आपलं जितकं वय आहे, तितकी शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे’ (व्हिडीओ)

by nagesh
Rupali Chakankar | ncp women state president rupali chakankar criticizes chandrakant patil

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतंच कोल्हापूर येथे बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. ‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि OBC च्या राजकीय आरक्षणावर केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी शरद पवार यांची प्रवृत्ती असल्याचं पाटील म्हणाले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘चंद्रकांत दादा आपलं जितक वय आहे तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे, अशा शब्दात रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी चंद्रकांतदादांना टोला लगावला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

‘गेल्या दिड वर्षापासून राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडली आहे.
हे संपुर्ण महाराष्ट्र पाहत आहे. या नियुक्त्या का रखडल्या आहेत? यामध्ये राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार काही नाव राज्यपांलाकडे देतं.
राष्ट्रीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ती नाव मान्य करतात.
मात्र, राज्यात आपली सत्ता नसल्याने केंद्र सरकार राज्यपालांना हाताशी धरुन अडवणूक करत आहे.
त्यामुळे राज्याचं हित लक्षात घेता. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवर बोलतांना कदाचीत राज्यपालांना वयोमानानुसार लक्षात राहत नाही.
असं भाष्य रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केलं आहे.

पुढे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, ‘मात्र, यावर बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या बाजूने बोलत आणि त्यांच्या मदतीला धावून जात, शरद पवार यांच्यावर टीका केली.
राज्यपाल भाजपाचे पदाधिकारी नाहीत.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)आपलं जितक वय आहे तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे. हे आपण लक्षात घ्यावं. चार दिवस दिल्लीत थांबूनही तुम्हाला अमित शाहा यांनी भेट नाकारली याबाबत तुम्ही आत्मचिंतन करावं.
असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Web Title : Rupali Chakankar | ncp women state president rupali chakankar criticizes chandrakant patil

हे देखील वाचा :

Pimpri-Chinchwad Corporation | कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना PCMC देणार 10 हजारांऐवजी 25 हजारांची मदत

MNS | गेली 20 वर्षे महाराष्ट्र राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण पाहतोय; मनसेचा पलटवार

PM Modi Temple Pune | पुण्यातील ‘मोदीभक्ता’नं उभारलं PM नरेंद्र मोदी यांचं मंदिर (व्हिडीओ)

Related Posts