IMPIMP

Sachin Sawant | काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा थेट सोनिया गांधींना पत्र लिहून राजीनामा

by nagesh
Sachin Sawant | congress leader sachin sawant resigns from his post as spokesperson of maharashtra congress

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Sachin Sawant | महाराष्ट्र काँग्रेसमधील फेरबदलानंतर नाराजी उफाळली आहे. काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी तातडीने आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा (Resigned) दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन सावंत यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. तर, महाराष्ट्र काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी (Congress spokesperson) अतुल लोंढे (Atul Londhe) यांची नियुक्ती केली आहे. यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.

सचिन सावंत (Sachin Sawant) हे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र काँग्रेसचा माध्यमातील चेहरा बनले होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून ते सातत्यानं काँग्रेसची व महाविकास आघाडीची बाजू ठामपणे मांडत होते.
काँग्रेसवरील टीकेचा प्रतिवाद करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठीही त्यांचे नाव चर्चेत होते.
पंरतु, नाना पटोले (Nana Patole) प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सावंत यांचे महत्त्व हळूहळू कमी झाले होते.
अशातच त्यांच्याकडील मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी काढून घेतली.
या कारणाने सचिन सांवत यांनी राजीनामा दिला आहे. असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, माध्यम आणि संवाद विभाग समितीमध्ये सावंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
तर, मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडं देण्यात आली आहे.
त्यामुळं सावंत यांना लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागणार आहे. नव्या बदलामुळं सावंत नाराज झाले आहेत.
परिणामी त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला.
या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं, असं पत्र त्यांनी काँग्रेस हायकमांडला लिहिलं आहे.
महत्वाचे म्हणजे, सचिन सांवत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रवक्ते पदाचा टॅग देखील काढला आहे.

Web Title : Sachin Sawant | congress leader sachin sawant resigns from his post as spokesperson of maharashtra congress

हे देखील वाचा :

Big B Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Pune News | ‘जे मिळेल त्यामध्ये खूष’ राहाणार्‍या रिपाइंची ‘महापौर’ पदाची मागणी केवळ दबावतंत्राचा भाग!

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढीचे सत्र सुरू, चांदीही महागली, जाणून घ्या आजचे नवीन दर

National Pension Scheme | NPS मध्ये मिळतात 3 प्रकारचे इन्कम टॅक्स बेनिफिट, जाणून घ्या कशाप्रकारे देतात फायदा

Related Posts