IMPIMP

विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये, संजय राऊत यांची टीका

by pranjalishirish
sachin-vaze-best-investigating-officer-said-shivsena-leader-sanjay-raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याच्या अधिवेशनात विरोधकांकडून मनसुख हिरेन Mansukh Hiren यांच्या आत्महत्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांचे नाव घेण्यात आले. या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे sachin vazeयांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. मनसुख हिरेन Mansukh Hiren यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर असल्याने त्यांच्याकडून पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. त्यामुळे सरकार सचिन वाझेंना sachin vaze पाठीशी का घालत आहे ? असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे सरकारने नमते घेऊन सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत केली.

काय म्हटले अनिल देशमुख
मनसुख हिरेन Mansukh Hiren मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. सचिन वाझे sachin vaze असो वा कुणीही, शासनाकडून कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे एटीएसला द्यावेत, तसेच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधान परिषदेत सांगितले. मात्र केवळ बदली नको, तर त्यांचं निलंबन करा, त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी विधानसभेसह विधान परिषदेतसुद्धा करण्यात आली. यावरून आता संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हटले संजय राऊत
सचिन वाझे sachin vaze हे उत्तम तपास अधिकारी आहेत. स्कॉर्पिओ गाडीचे प्रकरण फार काही मोठे नाही आहे. अंबानींच्या जिवाएवढीच सामान्य आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या जिवाची किंमत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने फक्त राजीनामा आणि बदल्यांमध्ये रमून जाऊ नये, अशी टीका संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आहे.

मी अजिबात समाधानी नाही : प्रवीण दरेकर
ठाकरे सरकार सचिन वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आमची सचिन वाझेची sachin vaze बदली नाही, तर निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी आहे. मनसुख हिरेन Mansukh Hiren यांचा खून सचिन वाझे यांनीच केल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या निर्णयावर मी अजिबात समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Gold Rates Today : सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनं-चांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर ? जाणून घ्या आजचे भाव

Maharashtra Budget 2021 : विरोधक आक्रमक म्हणताहेत; ‘आज त्यांना आम्ही सोडणार नाही’

Related Posts