IMPIMP

‘सचिन वाझेंसाठी वकिलाची गरज नाही; त्यासाठी उद्धव ठाकरे आहेत फडणवीसांचा हल्लाबोल

by amol
Sachin vaze doesn't need a lawyer; For that fadnavis attack on Uddhav Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सचिन वाझेंच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत आहाेत, पण ठाकरे सरकार यावर निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे. सचिन वाझेंकरिता वकिलाची गरज नाही, त्यासाठी मुख्यमंत्री Uddhav Thackeray आहेत, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने वीज कनेक्शन कापण्यावर स्थागिती दिली होती. पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवणे ही मोठी लबाडी असल्याचा हल्लाबोल फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे. आज ठाकरे सरकारकडून Uddhav Thackeray शेतकऱ्यांना विजेचा झटका देण्यात आला आहे. या सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त करू असे म्हटले होते. मात्र, शेतकऱ्याला एक नवा पैसा देण्यात आला नाही. या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक केली आहे. तसेच पीक विम्यासंदर्भात चुकीची माहिती देण्यात आली आहे.

पीक विम्याचे निकष ठरवणे व त्याचे टेंडर काढणे ही राज्य सरकारची जबाबदारी असते. प्रत्येक राज्य आपापल्या राज्याचं टेंडर काढतं, पण राज्य सरकारने मात्र टेंडर बदलले. परिणामी याचा फायदा विमा कंपन्यांना झाला, शेतकऱ्यांना झाला नाही. या बाबतीत राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यात येते; पण स्वत: मूक गिळून बसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे. ठाकरे सरकार हे लबाड सरकार असून, इतिहासात ठाकरे सरकारचं नाव लबाड सरकार म्हणून नोंदवलं जाईल, असे बोलत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Posts