IMPIMP

Sachin Vaze | नालेसफाई करणार्‍या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी वाझेवर होती, भाजपकडून आरोप

by omkar
Sachin Vaze

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील mumbai नालेसफाईच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांनी आज मुंबईतील mumbai नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी आशिष शेलार यांनी सचिन वाझेवर (Sachin Vaze) आरोप केले. “नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी सचिन वाझेवर होती, त्यामुळे वाझे आणि नालेसफाईच्या कामातील कनेक्शनची चौकशी झाली पाहिजे.” अशी भूमिका आशिष शेलार यांनी यावेळी घेतली.

Pune Crime News | वाहन आणि मोबाईल चोरी करणार्‍या सराईतांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं पकडलं, 7 गुन्हयांची उकल

नालेसफाईच्या पाहणीनंतर बोलताना आशिष शेलार म्हणाले,

“सचिन वाझेला (Sachin Vaze) महापालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगण्यात आले होते.
तशी माहिती न्यायालयाच्या रेकॉर्डवर आलेली आहे.
त्यामुळे नालेसफाईच्या कामाची आणि वाझेची चौकशी करण्यात यावी.
तसेच मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी पूर्णपणे झालेली नाही.
नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा खोटा आहे.
नालेसफाई करून दाखवण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला या जबाबदारीतून हात झटकता येणार नाही.
७० कोटी रुपये नालेसफाईसाठी खर्च केलेल्या महापालिकेला त्याचा हिशोब द्यावा लागेल.
शिवसेनेनं नाल्यावर शेती करण्याची नवीन योजना सुरू केला आहे.”

 विषय दाव्याचा नाही वाद्याचा आहे…

“मुंबईतील mumbai ३० वॉर्ड असे आहेत, जे शिवसेना आणि काँग्रेसला कधीही जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे.
७० कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे.
विषय दाव्याचा नाही वाद्याचा आहे.
मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही.
आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. ५ लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे? ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल, तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा,” असं आव्हान शेलार यांनी दिलं होतं.
काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले.

Also Read:- 

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

PM मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bill and Melinda Gates | …म्हणून तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

Pune Crime News : पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश

Web Title : Sachin Waze was responsible for recovering money from the cleaning contractor, the BJP alleged

Related Posts