IMPIMP

Sambhaji Brigade | छत्रपती संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्री करण्याची ‘ऑफर’, फक्त भाजपमधून बाहेर पडा !

by bali123
Sambhaji Brigade | firts goodbye bjp we are ready to make you cm said sambhaji brigade shivand bhanuse to chhatrapati sambhaji

औरंगाबाद न्यूज (Aurangabad News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Sambhaji Brigade | मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन खासदार संभाजीराजे (MP Chatrapati Sambhajiraje) यांनी आरक्षण जनसंवाद दौरा (Jan Samvad) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) सुरु केला आहे. काल बीड (Beed) मध्ये खासदार संभाजीराजे (MP Sambhajiraje) यांचा जनसंवाद झाला. यावेळी संभाजीराजे यानी संवाद साधताना मला मुख्यमंत्री करा (Make Me the CM) आणि मग प्रश्न विचारा असं वक्तव्य केलं होतं. यावर संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) प्रत्युत्तर दिले आहे. आगोदर भाजपमधून (BJP) बाहेर पडावं अन् संभाजी ब्रिगेडमध्ये (Sambhaji Brigade) सहभागी व्हावं… आम्ही संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडने दिलं आहे.

काय म्हणाले संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे ?

बीडच्या (Beed) कार्यक्रमात आमच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मला मुख्यमंत्री (CM) करा आणि मग प्रश्न विचारा असे म्हटलं. मला त्यांना सांगायचे आहे की, तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून (BJP) बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये (Sambhaji Brigade) प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते (Sambhaji Brigade Spokesperson) शिवानंद भानुसे (Shivanand Bhanuse) यांनी खासदार संभाजीराजे यांना दिले आहे.

काय म्हणाले होते खासदार संभाजीराजे ?

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्रीपदावर (CM) बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केले होते. बीड (Beed) दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) त्यांच्यावर प्रश्नांचा मारा केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यावेळी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला.
तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना (CM) आणि पालकमंत्र्यांना (Guardian Minister) विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही.
मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा (First make me the CM), असे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी म्हटले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Web Title : Sambhaji Brigade | firts goodbye bjp we are ready to make you cm said sambhaji brigade shivand bhanuse to chhatrapati sambhaji

Related Posts