IMPIMP

Sambhajiraje Chhatrapati | शिवबंधन बांधणार की नाही ?; छत्रपती संभाजीराजे म्हणाले…

by nagesh
Sambhajiraje Chhatrapati | Chhatrapati sambhaji raje says shivsena chief uddhav thackeray was playing tricks but eknath shinde did it over maratha reservation

मुंबई : सरकारसत्ता  ऑनलाइन – Sambhajiraje Chhatrapati | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील अशी अपेक्षा असल्याचे विधान संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलं आहे. संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या शिवसेना पक्ष (Shivsena) प्रवेशाबाबत आता पुन्हा तर्क वितर्क लढवले जात आहे.

राज्यसभेसाठी उत्सुक असलेले संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ”माझी मुख्यमंत्री उद्धवजींशी सविस्तर चर्चा झाली. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, मला हा ही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील,” असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संभाजीराजे आज (मंगळवार) मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
संभाजीराजे आजच मुंबईत दाखल होणार आहेत. संभाजीराजे यांनी 6 वी जागा ही आपल्याला द्यावी, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर मोठी चर्चा रंगली आहे. शिवसेनेने संभाजीराजेंनी पक्षात प्रवेश करावा त्यानंतर उमेदवारी जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर प्रत्यक्षपणे स्विकारलेली नसली तरी त्याबद्दलची सूचक प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिल्याने राजकीय चर्चेला उत आला आहे.

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | sambhaji raje spoke about joining shivsena before rajysabha election cm uddhav thackeray

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

Maharashtra Monsoon Update | कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

PMC Development Plan For The Merged 23 Villages | पुणे महापालिका समाविष्ट २३ गावांमध्ये ड्रेनेज लाईनच्या कामासाठी सल्लागार नेमणार

Pune PMC Action | स्टॉल्सचे बेकायदेशीररित्या ‘गाळ्यांमध्ये’ रुपांतर ! बिबवेवाडी गावातील स्टॉलधारक अडचणीत; महापालिकेने बिबवेवाडी रस्त्यावरील तब्बल 67 गाळे केले सील

Related Posts