IMPIMP

‘2 दिवस कळ काढा, बैठकीचा निरोप मिळेल’, राष्ट्रवादीकडून ‘करेक्ट कार्यक्रम’ झाल्यानंतर सतर्क झाली भाजप !

by sikandershaikh
Jayant Patil | Maha Vikas Aghadi Minister jayant patil on cm uddhav thackeray post should be given to another demanded chandrakant patil

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)sangli municipal elections | सांगली मिरज कुपवाड महापालिकेत (Sangali-Miraj-Kupwad Municipal Corporation) सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून भाजप (Bharatiya Janata Party – BJP) चा करेक्ट कार्यक्रम झाला. महापालिका महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryawanshi) आणि उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील (Unmesh Patil) यांची वर्णी लागली. भाजपचे 7 उमेवार फुटल्यानं राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग आणखीच सुकर झाला. या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला.

2 दिवस कळ काढा, बैठकीचा निरोप मिळेल

सांगली महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आता या सदस्यांना नेत्यांच्या निरोपाची प्रतिक्षा आहे. 2 दिवस कळ काढा, बैठकीचा निरोप मिळेल असं उत्तर त्यांना नेत्यांकडून मिळालं आहे. जिल्हा परिषेदतील पदाधिकारी बदलासाठी भाजप सदस्य आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही तर महापालिकेतील गोंधळामुळं गुरुवारची नियोजित बैठक रद्द करण्यात आली आहे. परंतु नेत्यांनी असाही निरोप दिला आहे की, पुढील 2 दिवसात ही बैठक घेऊ.

महापालिका निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी आता भाजप नेते वेळ काढत आहेत, गुरुवारची बैठक ही चंद्रकांत पाटील यांनी रद्द केली. तरी भाजपचे अनेक सदस्य दिवसभर जिल्हा परिषदेत बसून होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील भाजपच्या सदस्यांवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. महापालिकेचा पॅटर्न जिल्हा परिषदेत राबवता येतो का याची चाचपणीही सुरू आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ अवघ्या 1 वर्षांचा शिल्लक असल्यानं अनेक उलथापालथी पहायला मिळण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये जर बदल झाला नाही तर प्रसंगी अविश्वास ठरावाचा पवित्राही घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही वाहत्या गंगेत हात धुण्याची तयारी आहे.

सांगलीत नेमकं काय घडलं ?

सांगली मिरज कुपवाड महापालिकेत (sangli municipal elections) एकूण 78 जागा आहेत.
मंगळवारी महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक पार पडली.
महापालिकेत 78 पैकी सर्वाधिक म्हणजेच 41 जागा या भाजपकडे आहेत.
काँग्रेसकडे 19 तर राष्ट्रवादीकडे 15 जागा आहेत.
तरीही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांनी बाजी मारली.
भाजपला धक्का देत राष्ट्रवादीनं विजय मिळवला.
राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली तर भाजपच्या धीरज सु्र्यवंशी यांना 36 मतं मिळाली.
भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा अवघ्या 3 मतांनी पराभव झाला.
तर काँग्रेसचे उमेश पाटील यांनी भाजपच्या गजानन मगदुम यांना पराभव करत उपमहापौरपदाची माळ गळ्यात पाडून घेतली.
बहुमत असूनही भाजपची 6-7 मतं फुटल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय सोपा झाला.
कोरोनामुळं या निवडणुकीसाठीचं मतदान हे सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीनं झालं होतं.

Related Posts