IMPIMP

Sanjay Raut and Ashish Shelar | भाजप- शिवसेना एकत्र येणावरून पुन्हा चर्चा; संजय राऊत म्हणतात…

by bali123
Ashish Shelar | bjp leader ashish shelar criticizes shivsena mp sanjay raut and uddhav thackeray

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Sanjay Raut and Ashish Shelar | काही दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार (mahavikas aghadi government) पडणार असे वारंवार भाजपकडून (BJP) बोलले जात आहे. त्यातच दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची वैयक्तिक भेट घेतली. यामुळे भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यातील दुरावा संपला आहे पुन्हा एकदा युती होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. दरम्यानच्या काळात या भेटीगाठीवरून राज्यात वातावरण ढवळून निघाले होते. तर दुसरीकडे याच परिस्थितीचा फायदा घेत भाजपकडून (BJP) सरकार पडण्याचे भाकीत केले जात होते त्यामुळे संदिग्ध अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(Sanjay Raut and Ashish Shelar)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यातच आता आणखी एक भर पडली म्हणजे भाजपा नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या भेटीची. शनिवारी यासंदर्भात माध्यमांमध्ये बरेच खलबते झाले. मात्र आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माझी कोणासोबतही भेट झाली नाही. काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट झाली होती. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांना भेटतो, राजकारण म्हणजे हिंदूस्तान आणि पाकिस्तान नाही. भेटीगाठी राजकारणात होत असतात असा खुलासा केला. एकीकडे भेट झाली नाही असे म्हंटले तर शेवटी राजकारणात भेटी गाठी होत असतात असे राऊत यांनी म्हंटले. त्यामुळे भाजप- शिवसेना एकत्र येणावरून पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi government) भक्कम आहे. कोणत्याही अफवेमुळे काहीही होणार नाही. यापूर्वीही अनेक अफवा होत्या. माझ्या बोलण्यानं, लिहिण्यानं त्रास झाला म्हणून अफवा पसरवल्या जातात. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिलं पाहिजे. जनतेचे विषय मांडले पाहिजेत त्यावर चर्चा झाली पाहिजे गोंधळ करणं म्हणजे रणनीती नाही. असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. माझ्यामुळे अडचणी निर्माण होणारे अशा अफवा पसरवल्या जात आहेत. पण जेवढ्या अफवा पसरवाल तेवढं आम्ही मजबूत होऊ असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी एक दिवस अफवा पसरवणारे कारखाने दिवाळखोरीत जातील त्यामुळे अफवा पसरवल्यामुळे राजकारण अस्थिर होत असे काही नाही असेही त्यांनी सांगितले.

दोन अधिवेशन सुरळीत पार पाडायला हवं. सभागृहात राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. विरोधकांना जर महाराष्ट्राची काळजी असेल तर त्यांनी सभागृहाचे कामकाज गोंधळात होऊ न द्यावे. लसीकरण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारी यावरही चर्चा झाली पाहिजे. उरला प्रश्न विधानसभा अध्यक्षपदाचा यासंदर्भात मुख्यमंत्री बोलतील तेच आमचं मत आहे. असंही संजय राऊत म्हणाले.

काय आहे दावा?

भाजपकडून नेहमीच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे दावे केले जातात.
त्यातच मुंबईतील नरिमन पॉईंट येथे संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्तभेट झाल्याचा
दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात
येत आहे. तसेच या एकाच ठिकाणाहून दोन्ही नेत्यांच्या कार बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे
शनिवारी दिवसभर यावरच अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान, आशिष शेलार यांनी यावर
स्पष्टीकरण देताना अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे सांगितले.

Web Titel : Sanjay Raut and Ashish Shelar | shiv sena bjp come together sanjay raut revelation about meeting ashish shelar

Related Posts