IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपवर आरोप, म्हणाले – ‘BJP ने कोळसा घोटाळेबाजांकडून देगण्या घेतल्या’

by nagesh
Sanjay Raut | mahavikas aghadi will win 45 out 48 seats 2024 lok sabha elections sanjay rauts big prediction in one interview on TV

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | औरंगाबाद (Aurangabad) येथे शिवसेनेकडून (Shiv Sena) आज (शनिवारी) महागाईविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित होते. राऊत यांनी एमजीएम पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला. तसेच त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. कोळसा टंचाईवरून मोदी सरकारवर (Modi government) प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर, कोळसा घोटाळेबाजाकडूनच भाजपने (BJP) मोठ्या देणग्या घेतल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ‘यूपीए सरकार होते तेव्हा कोळसा घोटाळ्यावर भाजपने (BJP) संसद बंद पाडली होती.
संसदेचं कामकाज भाजपने करू दिलं नाही. मात्र, सत्तेत आल्यावर याच भाजपने कोळसा घोटाळा करणाऱ्याकडून मोठं मोठ्या देणग्या घेतल्या.
असा देखील गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मोर्चेदरम्यान राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं आहे. त्रिपुरात काही झालं आणि दंगे सुरू झाले.
महागाईवरुन जनतेने लक्ष हटवण्यासाठी हे सुरू केलं. महागाईचा प्रश्न विचारला की, हिंदू-मुसलमान, पाकिस्तान-भारत-चीन भारत असे विषय काढले जातात.
महाराष्ट्रात दंगली पेटवण्याची सुरुवात झाली. महाराष्ट्रात आग लावायची आणि राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
औरंगाबादचा मोर्चा इशारा आहे, आम्हाला हात लावला तर हात पेटवल्या शिवाय राहणार नाही.
कितीही कारस्थान झाले तरी महाराष्ट्रात शिवसेना तुमच्या छताड्यावर पाय देऊन पुढं जाणार आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पुढे राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या बाळकडू हा सिनेमा काढला होता.
आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. तसेच, जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर देखील एक सिनेमा बनवत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
तसेच, ‘जयभीम’ सिनेमा तुम्ही बघितला का, असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, जयभीम सिनेमा मी बघितला आहे.
चांगला सिनेमा आहे. जयभीम हा जातीवाचक शब्द नाही तर संविधानाचा विजय म्हणजे जयभीम असा आहे, असं ते म्हणाले.

Web Title : Sanjay Raut | bjp accepts donations from coal scammers serious allegations by shivsena mp sanjay raut

हे देखील वाचा :

Sharad Pawar | भाजपच्या माजी मंत्र्याचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतात’

Coronavirus in Maharashtra | मृतांच्या संख्येने वाढवली चिंता, राज्यात गेल्या 24 तासात 1,020 ‘कोरोना’मुक्त; जाणून घ्या इतर आकडेवारी

Karthiki Yatra | पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या नव्या 7 गाड्या धावणार

Related Posts