IMPIMP

Sanjay Raut On Nana Patole | संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले – ”नाना पटोलेंच्या हातात असेल तर त्यांनी आपली 42 मतं संभाजीराजेंना द्यावीत”

by Team Deccan Express
Sanjay Raut On Nana Patole | shiv sena mp sanjay raut on maharashtra cogress president nana patole over sambhajiraje candidacy

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut On Nana Patole | संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभा निवडणुकीतून (Rajya Sabha Elections) माघार घेतली आहे. शिवसेनेने (Shivsena) शब्द पाळला नसल्याचं म्हणत संभाजीराजेंनी आपण राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. यावरुन आता राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. यानंतर शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Sanjay Raut On Nana Patole)

संजय राऊत दोन दिवस कोल्हापूर (Kolhapur) दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि चंद्रकात पाटील (Chandrakat Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये, चंद्रकांत पाटील काही शिवाजी महाराजांचे वंशज नाहीत,” अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

पुढे संजय राऊत यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावरही निशाणा साधला आहे.
”नाना पटोलेंच्या हातात असेल, तर त्यांनी आपली 42 मते संभाजीराजेंना द्यावीत,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच, ”या राज्यात विरोधी पक्ष आहे पण ते विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे.
एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे.
यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न
करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे.” असं राऊत म्हणाले.

Related Posts