IMPIMP

Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati | ‘…तर संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल’; संजय राऊतांचं मोठं विधान

by Team Deccan Express
Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati | shivsena leader and mp sanjay raut clarifies on sambhaji raje chhatrapti rajyasabha nomination

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी नुकतंच आपली भुमिका स्पष्ट केली आहे. राज्यसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. अपक्ष म्हणून राज्यसभेवर जाण्याचा निर्धार बोलून दाखवत सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) गुरूवारी भेट घेतली. यामुळे अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, “शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे की राज्यसभेची 6 वी जागा शिवसेना लढवेल. संभाजीराजे भोसले शिवसेनेचे उमेदवार होणार असतील, तर त्या बाबतीत नक्कीच विचार केला जाईल. छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत. आमची भूमिका आहे की दुसऱ्या जागेवर देखील शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा,” असं ते म्हणाले.

दरम्यान, संभाजीराजे यांना शिवसेना (Shivsena) अथवा महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे या चर्चेला उधाण आलं आहे.
त्याचबरोबर आता संजय राऊत यांनी देखील राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तसेच संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Web Title :- Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati | shivsena leader and mp sanjay raut clarifies on sambhaji raje chhatrapti rajyasabha nomination

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts