IMPIMP

Sanjay Raut । काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार? संजय राऊत म्हणाले…

by bali123
Sanjay Raut | shiv sena not demanded prithviraj chavan speaker assembly sanjay rauts told congress sonia gandhi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यानंतर मागील काही महिन्यापासून विधानसभा अध्यक्षपदी (Speaker of the Assembly) कोणाची निवड झाली नाही. तो विषय आजतागायत रखडत आहे. या मुद्यावरून राजकीय वर्तुळात सतत चर्चा, आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचाच अध्यक्ष होणार असं काँग्रेसने (Congress) म्हटलं आहे. तर याच विषयावरून आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. ही जागा काँग्रेसचीच होती, त्यांचाच अध्यक्ष होणार असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (Prithviraj Chavan to become Assembly Speaker? Sanjay Raut said…)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हणाले संजय राऊत?

विधानसभा अध्यक्षपदाची (Speaker of the Assembly) निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. ही जागा काँग्रेसचीच होती, त्यांचाच अध्यक्ष होणार, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. तसेच, त्यांचा कोण उमेदवार असेल हे सोनिया गांधी (Sonia Gandhi) ठरवतील, असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद (Speaker of the Assembly) हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. विरोधकांनी ही निवडणूक नाही लढविली तर महाराष्ट्रावर उपकार होतील, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले, ‘विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हा काँग्रेसचा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री, राष्ट्रवादी आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली असेल, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची शिवसेनेची (Shiv Sena) मागणी असल्यावर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार शिवसेना ठरवत नाही, शिवसेनेचा असेल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठरवतील. सोनिया गांधींशी ठाकरेंचे चांगले संबंध आहेत. कोणता प्रसंग उभा ठाकल्यास ते एकमेकांशी चर्चा करतात, असं देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाविषयी आस्था असेल तर पंतप्रधान लक्ष घालतील –

संजय राऊत यांनी मराठा आरक्षण विषयी देखील भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, ‘मराठा समाजाविषयी आस्था असेल तर पंतप्रधान लक्ष घालतील.
आता केंद्र सरकारनेच (Central Government) यातून मार्ग काढावा,
असं म्हणत, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शहांना जाऊन भेटले,
त्यात चर्चा करण्यासारखे काय.
मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह भेटले होते.
त्यावेळी देखील वेगळी चर्चा रंगली होती, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

Web Titel :- Sanjay Raut | shiv sena not demanded prithviraj chavan speaker assembly sanjay rauts told congress sonia gandhi

Related Posts