IMPIMP

Sanjay Raut | सज्जन, निरागस, निष्पाप ! संजय राऊतांचा सल्ला; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता…’

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil reply on sanjay raut urges bjp should give utpal parrikar cadidature in goa polls

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Sanjay Raut | शिवसेना नेते (Shivsena) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) जोरदार टोला लगावला आहे. ‘चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट आहेत. त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावी. उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं’ असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. तसेच, चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या (BJP) अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे, त्यावेळी संजय राऊत दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”या संपूर्ण देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता येईल का हे पाहतो. त्यांना श्रवणयंत्रपण देणार आहे. शिवसेना असे मेडिकल कॅम्प घेत असतं. जर कोणाला गरज असेल तर त्यांच्यावर उपचार करु. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे सुरु आहे.” असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले, ”मुंबै बँकेच्या अध्यक्षपदीही महाविकास आघाडीचं नेतृत्व आले आहे.
हळूहळू या सगळ्या संस्था, संघटना यावर महाविकास आघाडीचा कब्जा असेल.
चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट आहेत.
त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावी.
उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं,” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Sanjay Raut | shivsena leader and MP sanjay raut on bjp chandrakant patil maharashtra government cm uddhav thackeray

हे देखील वाचा :

ESIC Recruitment 2022 | 10 वी पास असो किंवा ग्रॅज्युएट, सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ! 3800 पेक्षा पदांसाठी भरती

Pune Crime | सराईत गुंडाने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ परिसरातील घटना

Sambhaji Patil Nilangekar | संभाजी पाटील निलंगेकरांचा पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

Related Posts