IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले – ‘आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र 2 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला’

by nagesh
Sanjay Raut on Devendra Fadnavis | shivsena leader and mp sanjay raut answers bjp leader devendra fadanvis question over hanuman chalisa row

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि विऱोधक भाजप यांच्यात वेगवेगळ्या मुद्यांवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्रा दोन वर्षांपासून स्वतंत्र झाला, अशा शब्दांत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

1947 मध्ये जसे आंदोलन झाले, ‘चलेजाव’ची चळवळ झाली म्हणून ब्रिटिश सरकार (British Government) पळाले.
तसेच जनता रस्त्यावर आली असती तर कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री आहे हे जनतेने पाहिले नसते.
त्यामुळेच कायदे (Farm Laws) मागे घेण्यात आल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.
तसेच नाशिक महापालिकेत (Nashik Corporation) शिवसेनेचे (Shivsena) 100 नगरसेवक निवडून येतील,
असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवला.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्वतंत्र झाला
आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला (maharashtra) दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र (independent) करत भगवा फडकवला,
असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला. शेतकरी मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता.
शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा होता. गाड्या घातल्या गुंड पाठवले परंतु शेतकरी हटला नाही.
दीड वर्षांपासून शेतकरी तणाव, दबावात होता. त्या जोखडातून बाहेर निघाले, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut slams bjp and said we did maharashtra became independent two years ago marathi news nashik

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला   पावसाचा इशारा 

Aurangabad Crime | मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा आणि सुनेनं केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू; प्रचंड खळबळ

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक

Related Posts