IMPIMP

Sanjay Raut | अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीवरून शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली?’

by nagesh
mp navneet rana may be in trouble as mva government can order inquiry about allegation of loan from yusuf lakdawala

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Sanjay Raut | अमरिंदर सिंग (amrinder singh) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तेथे घडामोडींनी वेग आला किंबहुना काँग्रेसचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) आणि अमरिंदर सिंग यांची दिल्लीत भेट झाली. त्यावरून देशभरात चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीवरून शिवसेनेने केंद्र सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण सोडले आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग (amrinder singh) यांनी भाजप नेत्यांना (BJP Leader) भेटणार नसल्याचे सांगितले होते. पण लगेचच दुसऱ्या दिवशी ते अमित शहांना भेटले. शेतकरी आंदोलन, सीम सुरक्षा यावर आपण चर्चा केली, असे धादांत खोटे ते बोलतात. जर हे विषय खरेच महत्त्वाचे असतील तर गृहमंत्र्यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे ही रीत कुठली? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचे हे नवे पायंडे बरे नसल्याचे शिवसेनेने (Sanjay Raut) म्हंटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हंटले आहे सामनाच्या अग्रलेखात….

काँग्रेसचे नेतृत्त्व जे करायचे ते करील पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरट्या मारण्याचे उद्योग सुरू आहेत.
पंजाबमध्ये जे घडवलं जात आहे ते पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातही घडवण्याचा प्रयत्न केला जातो. पश्चिम बंगालमध्ये भाजप विरोधी पक्षात आहे.
तेथे केंद्राचे लोक सरकारला डावलून विरोधकांना चर्चेसाठी बोलावतात. त्यांच्या सुचनेनुसारच राज्यसंदर्भात निर्णय घेतले जातात.
महाराष्ट्रात ही तेच आहे. येथील विरोधी लोक डोहाळे जेवणच असल्यासारखे नित्यनेमाने दिल्लीला जातात आणि राज्याबाबत केंद्राचे कान भरतात असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
काँग्रेसमध्ये वर्षानुवर्षे ज्यांनी पदे भोगली, सत्तेचा मलिदा खालला त्या म्हातार महामंडळाने ‘जी-२३’ नावाचा गट स्थापन केला. तेच आता अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणत आहेत.
या म्हातार महामंडळाचा राहुल गांधींनी देशातील ‘जनतेचा आवाज’ बनू नये, असाही आग्रह असतो.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राहुल यांची तोफ केंद्र सरकारच्या विरोधात सतत धडधडतच असते. ते सरकारला घेरण्याची एकही संधी सोडत नाही.
बहुधा हेच काँग्रेसमधील या ‘म्हाताऱ्या अर्कां’ ना खटकत आहे’, असंही शिवसेनेनं (Sanjay Raut) म्हटलं आहे.

पंजाब हे सीमेवरील राज्य. तेथील अशांतता व असंतोषामुळे देशाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. हजारो लोकांचे रक्त त्यात सांडले.
भिंद्रनवाले प्रकरण हा काळा अध्याय होता तो संपून आता पंजाबने नवा अध्याय सुरू केला.
पुन्हा राजकीय अशांतता निर्माण झाली तर अतिरेकी प्रवृत्ती डोके वर काढतील, याचे भान केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठेवण्यातच देशाचे हित आहे,’
अशा शब्दांत शिवसेनेनं (Shivsena) भाजपवर निशाणा साधला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा देशाच्या गृहमंत्र्यांना अधिकार आहे, पण अमरिंदर यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याप्रमाणे पंजाब सीमेवर काय घडले आहे?
काश्मीर, लेह-लडाखप्रमाणे तेथेही कोणी घुसखोरी करत आहे का ? कधी पाकिस्तान तर कधी चीन घुसखोरी करत आहेत पण मुख्यमंत्रीपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली.
गृहमंत्र्यांना त्याबद्दल जी बहुमोल माहिती मिळाली ती देशाला समजेल काय? अमरिंदर यांच्याप्रमाणेच राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानेच आम्हालाही चिंता वाटते, असा टोला शिवसेनेनं अग्रलेखातून लगावला आहे.

Web Title : Sanjay Raut | shivsena reaction on captain amrinder singh meets home minister amit shah saamana editorial

हे देखील वाचा :

Digital Media संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर !

Monsoon | ‘मान्सून’ परतीच्या प्रवासाला उशिरा सुरूवात; 1960 नंतरची ‘ही’ दुसरी वेळ

जर पसंत नसेल Aadhaar Card वरील फोटो तर ‘या’ सोप्या पद्धतीने बदलू शकता; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Related Posts