IMPIMP

Satara District Bank Election | सातार्‍यात महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का ! गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, शशिकांत शिंदे पराभूत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा 1 मतानं केला ‘घात’

by nagesh
Satara District Bank Election | Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai and Shashikant Shinde losse in Satara District Bank Election while Vikramsinh Patankar and Gyandev Ranjane are won

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Satara District Bank Election | सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का बसला असून गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai), राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (NCP MLA Shashikant Shinde ) हे पराभूत झाले आहेत. (Satara District Bank Election) शशिकांत शिंदे यांचा केवळ १ मतांनी पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पाटणमध्ये (Patan) शंभुराज देसाई व पाटणकर हे परस्परांचे विरोधक. पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (Vikramsinh Patankar) यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर (Satyajeet Singh Patankar) यांनी ५८ मते मिळवून गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Minister of State for Home Affairs shambhuraj desai) यांचा पराभव केला.

जावळी (jawali ) सेवा विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा १ मताने धक्कादायक पराभव झाला. तेथे विरोधी ज्ञानदेव रांजणे (Gyandev Ranjane) विजयी झाले आहेत. शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली तर रांजणे यांना २५ मते मिळाली.

सातारा जिल्हा बँकेच्या  २१ जागांसाठी ही निवडणूक होती.
त्यापैकी आमदार शिवेंद्रसिंह राजेंसह (Shivendraraje Bhosale) १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
रविवारी ११ जागांसाठी मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. त्यातील पहिलाच निकाल शशिकांत शिंदे यांचा आला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Satara District Bank Election | Minister of State for
Home Affairs Shambhuraj Desai and Shashikant Shinde losse
in Satara District Bank Election while
Vikramsinh Patankar and Gyandev Ranjane are won

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR

Indian Air Force Recruitment 2021 | 10 वी ते पदवीपर्यंतच्या मोठी संधी ! भारतीय वायुदलात ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या

Darwin Electric Scooter | डार्विनची नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर ! अवघ्या 68,000 रुपयात खरेदी करता येणार; शानदार फिचर्सही मिळणार

Related Posts