IMPIMP

Satara Lockdown | साताऱ्यातील लॉकडाऊन तातडीने मागे घ्या, आमदार शिवेंद्रराजे भोसले आक्रमक (व्हिडिओ)

by bali123
satara lockdown | shivendraraje bhosale demands collector shekhar sinh to unlock satara lockdown otherwise

सातारा न्यूज (Satara News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Satara Lockdown | साताऱ्यात (Satara) कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढल्याने सातारा जिल्हा प्रशासनाने (Satara District Administration) सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Satara Lockdown) केले आहे. हे निर्बंध अन्यायकारक आहेत. साताराकरांचा (Satara) उद्रेक होऊ देऊ नका. एकिकडे निवडणुकीला (Election) प्रशासन विरोध करत नाही. दुसरीकडे बाजारपेठा मात्र बंद ठेवत (market close) असल्याने प्रशासनाचा हा निर्णय खूपच अन्यायकारक आहे. कडक निर्बंध लावल्याने व्यापाऱ्यांमधून विरोध होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंधाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांनी केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लॉकडाऊन तातडीने मागे घ्या…

दोन दिवसांपूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाने (Satara District Administration) कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची (Satara Lockdown)घोषणा केली. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या काळात अत्यावश्यक सेवा (Essential service) सुरु राहणार आहेत. अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी विरोध केला आहे. आज जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांनी सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन (Satara District Lockdown) तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. तसेच तुम्हाला निवडणुका चालतात आणि बाजरपेठाच का बंद ठेवायच्या ? असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला विचारला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हवं तर विकेंड लॉकडाऊन कडक करा

शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) म्हणाले, एकच आठवडा व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची संधी मिळाली. आत्ताच्या कडक लॉकडाऊनला (Satara District Lockdown)नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय मागे घ्यावा. निर्बंध कायम ठेवा. हवं तर विकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) मेडीकल सुविधा सोडली तर कडक करा. मात्र, लॉकडाऊन मागे घ्या. यासोबत रुग्ण संख्या का वाढत आहे या मागचे नेमके कारण काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुण्यासारख्या (Pune) महानगरात रुग्ण कमी होत आहेत. तर मग इथेच का वाढत आहेत. काही गोष्टीमध्ये प्रशासन कमी पडतय का याचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.

आंदोलन करणार नाही

शिवेंद्रराजे म्हणाले, सातारकरांनी जिल्हा प्रशासनाला पहिल्यापासून सहकार्य केलं आहे. व्यापारी वर्गाने तर खूप मोठे सहकार्य केलं आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन वगैरे करणार नाही. जिल्हा प्रशासनाला आम्हाला अडचणीत आणायचे नाही. कोरोना संकट काळात आमची सहकार्याची भूमिका राहील, असे शिवेंद्रराजे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Web Titel : satara lockdown | shivendraraje bhosale demands collector shekhar sinh to unlock satara lockdown otherwise

Related Posts