IMPIMP

Shahu Chhatrapati On Devendra Fadnavis | शाहू छत्रपतींचा खळबळजनक आरोप; म्हणाले – ‘संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही तर फडणवीसांची खेळी’

by Team Deccan Express
Shahu Chhatrapati On Devendra Fadnavis | sambhaji raje chhatrapati fights independence in rajyasabha election is a political game of bjp and devendra fadnavis chhatrapati shahu maharaj

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Shahu Chhatrapati On Devendra Fadnavis | राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. सहाव्या जागेच्या निवडणूकीवरुन सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोप होत आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपतींच्या (Sambhajiraje Chhatrapati) उमेदवारीवरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवणार असं जाहीर केलं होतं. मात्र कोणत्याच पक्षाकडून होकार न आल्याने अखेर संभाजीराजेंनी आपण राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही, असं सांगितलं. दरम्यान संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून शाहू छत्रपतींनी (Shahu Chhatrapati) प्रतिक्रिया दिली आहे.

शाहू छत्रपती म्हणाले, ”कुठल्याही पक्षाने संभाजीराजे बाबत ठोस भूमिका न घेतल्याने त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. इतकेच नाही तर बहुजन समाजाच्या मतांत विभाजन व्हावे यासाठी भाजपाने (BJP) जाणीवपूर्वक ही खेळी खेळल्याचा आरोप त्यांनी केला. जानेवारी महिन्यापासून संभाजीराजे खासदारकीसाठी प्रयत्नशील होते. आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. दीर्घकाळ लढाई करावी लागेल. हा संघर्ष खूप मोठा असल्याचं,” ते म्हणाले. (Shahu Chhatrapati On Devendra Fadnavis)

दरम्यान, संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) अपक्ष लढणार असं जाहीर केलं होतं.
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली.
मात्र, संभाजीराजेंनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करावा असं सांगण्यात आलं.
संभाजीराजे अपक्षाच्या भूमिकेवर ठाम असल्याने त्यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला.
त्यानंतर शिवसेनेने सहाव्या जागेचा उमेदवार जाहीर केल्याने मराठा क्रांती संघटनेने नाराजी दर्शवली.
या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

Web Title :- Shahu Chhatrapati On Devendra Fadnavis | sambhaji raje chhatrapati fights independence in rajyasabha election is a political game of bjp and devendra fadnavis chhatrapati shahu maharaj

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts