IMPIMP

पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने शरद पवारांना पुन्हा ब्रीज कँडीत दाखल

by pranjalishirish
sharad pawar health ncp nawab malik tweet admitted breach candy hospital

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्या पोटात दुखू लागल्याने सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी तपासणी करुन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. परंतु आज पुन्हा पोटदुखीचा त्रास होऊ लगल्याने त्यांना पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

नवाब मलिक यांनी ट्विट करुन माहिती देताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्यावर उद्या (बुधवार) शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, आजच पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपासण्या आणि औषधोपचार या ठिकाणीच होणार असून परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत.

सोमवारी (दि.29) देखील शरद पवारांना अशाच पद्धतीने पोटात दुखू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी बुधवारी त्यांची सर्जरी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी शरद पवार Sharad Pawar ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल होणं अपेक्षित होते. मात्र, आज पुन्हा पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

काळजीचे काहीही कारण नाही- राजेश टोपे
राजेश टोपे यांनी सांगितले की, हा बॉल स्टोनचा त्रास आहे. त्यासाठी एंडोस्कोपी उद्या केली जाईल. त्यांची प्रकृती ठीक आहे. डॉ. मायदेव त्यांच्यावर एंडोस्कोपी करतील. पोटात दुखतंय म्हणून त्यांना दाखल करण्यात आलं आहे. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. उद्या दुपारी 3 च्या सुमारास एंडोस्कोपी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts