IMPIMP

Sharad Pawar | एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

by nagesh
Sharad Pawar | why not taken union minister narayan rane resign sharad pawar asks bjp

महाबळेश्वर : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | एसटी महामंडळाचे (MSTRC) सरकारी सेवेत समावेश करण्याच्या मागणीवरुन एसटी कामगारांचा मागील काही दिवसांपासून राज्यव्यापी संप (ST workers strike) सुरु आहे. दरम्यान, आज संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात महत्त्वाची बैठक सुरुय. संप कसा मिटणार याकडे राज्याचे लक्ष लागून असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) एसटी विलीनीकरणाबाबत एक मोठं विधान केलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, ‘राज्यात एसटीची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. एसटीच्या संपावर (ST workers strike) मी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केलीय.
एसटी कधी राज्य सरकारचा आधार घ्यावा लागला नाही. इतक्या वर्षात कधीच राज्य सरकारचा आधार घेतला नाही.
एसटीबाबत सामान्य माणसाचं मतही महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
तर, एसटीचं विलीनकरण केल्यास बाकीच्या महामंडळाचंही विलीनीकरण करावं लागेल. शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय अन्य आरोग्य खात्यातील कर्मचारी, आशा वर्कर्स आहेत.
एका विलीनीकरणाचं सूत्र अवलंबलं तर ते सर्वांना लागू होईल, असा मुद्दा पवार (Sharad Pawar) यांनी मांडला.
विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात, त्यावर आता बोलणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘1948 साली एसटीला सुरुवात झाली, तेव्हापासून गेली 2 वर्ष सोडली तर कधीही एसटीला राज्य सरकारचा आधार घ्यावा लागला नाही.
स्वत:च्या ताकदीवर एसटी आपला अर्थव्यवाह सांभाळत आलीय. पण अलिकडच्या काळात राज्य सरकारने 500 कोटी रुपये वेतनवाढ करण्यासाठी एसटीला दिले.
एसटीचं अर्थकारण कसं सुधारायचं यावर आम्ही चर्चा केली आहे.

दरम्यान, एसटीचं अर्थकारण कसं सुधारायचं यावर चर्चा झाली. 5 राज्यांचं वेतन तपासलं, गुजरातचं वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.
बाकीच्या म्हणजे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे.
वेतनाचा फरक आहे तो भरुन काढा, इतर राज्यांचं वेतन पाहून त्यावर मी पर्याय सांगितल्याचं पवार म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :  Sharad Pawar | ncp chief sharad pawar big statement over maharashtra st workers strike msrtc

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात तिसर्‍या लाटेचा धोका ! घाबरु नका, पण काळजी घ्या; राजेश टोपे म्हणाले…

WBBL | टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 106 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts