IMPIMP

Sharad Pawar | खा. अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भूमिकेवरुन शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
Sharad Pawar | ncp chief sharad pawar on controversy over amol kohle nathuram godse role in film why i killed gandhi

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) एका वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याचे दिसत आहे. कारण अमोल कोल्हे यांच्या ‘Why I killed Gandhi’ या चित्रपटावरुन वाद सुरू झाला आहे. हा चित्रपट 30 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ते नथुराम गोडसेच्या भूमिकेत झळकले आहेत. त्यामुळे राजकिय क्षेत्रात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर अनेकजण याला विरोध करताहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही अमोल कोल्हेंच्या भुमिकेला विरोध केला. कोल्हे यांच्या भुमिकेवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका केली असल्याचं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ”महात्मा गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल.”

”छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे सीतेचं अपहरण केलं याचा अर्थ प्रत्यक्ष सीतेचं अपहरण त्या कलाकारने केलं असा होत नाही. रावणाचा इतिहास त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अमोल कोल्हेंनी यासंबंधीची भूमिका घेतली असेल तर ती कलावंत म्हणून आहे,” असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान पुढे शरद पवार म्हणाले, ”भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले.
भाजपा आणि आरएसएसच्या इतिहासावर मी भाष्य करु इच्छित नाही.
पण एक काळ असा होता की गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या कुठे आहेत ते बघितलं पाहिजे.
त्यानंतर त्यांनी बोलावे, तसेच आव्हाडांच्या टीकेसंबंधी विचारलं असता पवार म्हणाले, त्यांनी त्यांचं मत मांडलं असं ते म्हणाले.
तसंच मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar on controversy over amol kohle nathuram godse role in film why i killed gandhi

हे देखील वाचा :

Arthur Road Jail | मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात असलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Shehnaaz Gill | शहनाज गिलच्या डायलॉगवर यशराजने पुन्हा बनवले गाणे; ‘बोरिंग डे’ ऐकून लोकांना लागलं पुन्हा वेड

Kolhapur Crime | डोक्यात दगड घालून अपंग पतीचा पत्नीने केला खून; प्रचंड खळबळ

Related Posts