IMPIMP

Sharad Pawar | IPS अधिकारी अजूनही फडणवीसांना भेटतात; शरद पवार म्हणाले…

by nagesh
Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis takes a dig at ncp chief sharad pawar on babasaheb ambedkar jayanti

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक आरोप केला आहे. राज्यातील IPS अधिकारी मुंबई व दिल्लीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटतात. त्यानंतरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना ED आणि CBI मार्फत लक्ष्य केलं जातं, असं ते म्हणाले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार हे आज पुण्यात (Pune) एका कार्यक्रमात बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना भेटण्यात गैर काही नाही. मात्र अधिकाराचा गैरवापर होता कामा नये,’ असं शरद पवार म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले, ‘मी अनेक वर्षे सत्तेत होतो, अनेक वर्षे विरोधी पक्षात होतो. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा सगळे अधिकारी मलाही भेटत होते.
मी एखादी सूचना केली आणि ती योग्य असेल तर त्याला नाही म्हणायचे नाहीत. असं ते म्हणाले.

लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणं यात गैर काही नाही.
अधिकाराचा गैरवापर होत असेल तर ते अयोग्य आहे.
त्यामुळं माजी मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना भेटत असतील, उद्या पृथ्वीराज चव्हाणही अधिकाऱ्यांना भेटले तर यात काही चिंता करण्याचं कारण नाही.
अधिकारी हे सर्वांना व्यवस्थित ओळखत असतात.
कधी, केव्हा, कशी पावलं टाकायची हे त्यांना बरोबर माहीत असतं, असं देखील शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हणाले मलिक?

ED व CBI च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे.
केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यानं ED व CBI च्या माध्यमातून या राज्यांना बदनाम केलं जात आहे. सुप्रीम कोर्टानंही ईडी व सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
भाजपचं हे राजकारण जनता बघत असून येत्या काळात जनताच याचं उत्तर देईल,’ असं नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं आहे.

Web Title : Sharad Pawar | nothing objectionable if devendra fadnavis meets ips officer says sharad pawar

हे देखील वाचा :

Murder in Pune | बहिणीसोबत केलेल्या कृत्याचा घेतला बदला, पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या घटनेचा पर्दाफाश

Sharad Pawar | सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याने माझ्या ज्ञानात भर पडली’; शरद पवारांचा टोला

Uday Samant | राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासुन सुरु होणार – उदय सामंत यांची घोषणा

Related Posts