IMPIMP

Sharad Pawar on Chandrakant Patil | ‘हिमालयात जाईन असं शरद पवार देखील म्हणाले होते’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Sharad Pawar on Chandrakant Patil | sharad pawar had also said that he would go to the himalayas says chandrakant patil

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये (North Kolhapur by-election) भाजपचे नेते सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांचा पराभव झाला होता.
काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी विजय मिळवला होता.
तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Sharad Pawar on Chandrkant Patil) यांनी हिमालयात जाण्याबाबत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Chandrkant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मी काँग्रेसमध्ये (Congress) जाण्यापेक्षा तोंड काळ करून हिमालयात जाईल, असं जाहीरपणे शरद पवार यांनी वसंत व्याख्यानमालिकेत सांगितलं होतं,
मग राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आता पवारांना घेऊन हिमालयात जाणार का ?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
त्यासोबतच पाटलांनी राष्ट्रवादीच्या कोल्हापूरमधील झालेल्या सभेवरूनही शरद पवारांना टोला हाणला आहे. (Sharad Pawar on Chandrakant Patil)

शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) जंगी सभा घेतली मात्र ते भाषणाला उठल्यावर लोक उठून जात होत होते याच्या क्लीप व्हायरल होत आहेत.
2014 मध्ये कोल्हापूरमध्ये त्यांचे दोन आमदार निवडून आले होते, 2019 ला तर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि राजेश पाटील (Rajesh Patil) हे तर काठावर निवडून आले होते.
2014 मध्ये स्वतंत्र लढल्यावर कोल्हापूरमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 8 हजार मते आणि भाजपच्या उमेदवाराला 40 हजार मते होती मग कशाच्या जीवावर तुम्ही गमजा मारता असा सवाल पाटलांनी पवारांना विचारला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, महाराष्ट्रभर बदनामी होत असताना मुख्यमंत्री हे हाताची घडी घालून बसले आहेत.
भोंग्यांबाबत बैठकीला हे अनुपस्थित राहणार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief raj Thackeray) यांनी उपस्थित रहावं अशी अपेक्षा हे कसं शक्य आहे ?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Web Title :- Sharad Pawar on Chandrakant Patil | sharad pawar had also said that he would go to the himalayas says chandrakant patil

हे देखील वाचा :

Side Effects Of Aloe Vera Juice | कोरफड रसाचे जास्त सेवन केल्याने नुकसान होऊ शकते; जाणून घ्या

LIC Jeevan Anand Policy | एलआयसीच्या ‘या’ पाॅलिसीत मिळवा अधिक रिटर्न्स ! दररोज जमा करा 47 रुपये अन् मिळवा 25 लाख, जाणून घ्या

NCP Chief Sharad Pawar | ‘…म्हणून राजद्रोहाचा कलम दुरूस्त करा किंवा रद्द करा’

Related Posts