IMPIMP

Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी केलं शिवसेनेचं कौतुक

by omkar
Sharad Pawar ...म्हणून शरद पवार यांनी केलं शिवसेनेचं कौतुक
सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) स्थापना दिनानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार Sharad Pawar यांनी सत्तेत शिवसेनेचे (Shiv Sena) कौतुक करून, शिवसेनेच्या कार्याला प्रशस्तीपत्र देऊन टाकले. कधी विचारही केला नव्हता की, शिवसेनेबरोबर आपण सत्ता स्थापन करु. शिवसेना हा विश्वासपात्र पक्ष आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) किती दिवस टिकेल यावर शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष नुसतं टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार असल्याचं पवार यांनी म्हटलं. शरद पवार (Sharad Pawar) हे काल गुरुवारी (दि.10) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते

Pune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी पतीच्या घरासमोर जाळला महिलेचा मृतदेह, तिघांविरोधात FIR

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेचं तोंडभरून कौतुक केलं.

शरद पवारांचे (Sharad Pawar) कौतुक हा काही शिवसेनेसाठी गौरवाचा भाग असू शकत नाही.
तर सत्तेच्या उबीत राहताना दिल्या घेतल्या वचनांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न असू शकतो.
खा. शरद पवार (Sharad Pawar) जे बोलतात त्यामागे अनेक अर्थ असू शकतात.
सत्तेच्या असणाऱ्या पायऱ्या आबाधित राखण्याच्या असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात अशी जाणीव शरद पवारांना (Sharad Pawar) आहे म्हणून त्यांनी शिवसेनेचं कौतुक केलं.
तसेच, काल राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress) बावीस वा वर्धापनदिन होता.
बावीस वर्ष झाली पक्ष अजूनही चालतो आहे.
या कालावधीत राष्ट्रवादी पक्षाने अलीकडेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षाशी जवळीक साधली आहे. सत्ता हेच समीकरण असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य यामध्येच आहे असा एक अंदाज खा. शरद पवारांचा (Sharad Pawar) असू शकतो.
म्हणूनच त्यांनी शिवसेनेचे कौतुक केलं आहे.

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना फार गांभीर्याने घेऊ नका’

सवांद साधतेदरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेचे कौतुक केले तो राजकारणाचा भाग आहे.
आमचा तुमच्यावर भरवसा आहे.
बाळासाहेब आत एक आणि बाहेर एक असे राजकारण करत नसत.
त्यांनी थेट इंदिरा गांधी यांना कसा पाठिंबा दिला हे सांगून शिवसेना पक्षाला इतिहासाची उजळणी करून दिली.
त्यांनी यापूर्वीही हे सांगितले आहे.
मात्र, आज सांगायचे कारण म्हणजे आमचा तुमच्यावर विश्वास आहे.
हे सांगायचे आहे.
परंतु, तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणजे तुम्ही दुसरा विचार करायला मोकळे झाला असे नाही.
म्हणजे, एकूण काय तर हा उंदीर मांजराचा खेळ आहे. दोघेही एकमेकाला जोखत आहेत.
असे सूचक विधान निघते.

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील काही प्रलंबित प्रश्न घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीत पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट झाली.
विशेष म्हणजे याच भेटीमागे वेगवेगळी अर्थ लपलेले आहेत.
तसेच सध्या भारतीय जनता पक्ष हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत.
तसेच, दुसरी गोष्ट म्हणजे, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाने राज्य ढवळून निघालं.
या प्रकरणाशी थेट संबंध ठाकरे यांच्याशी जोडले गेले.
परंतु, काही दिवसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.
म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संबंध पाहिलं कालावधीत धुसफुसले.

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Web Title :  Sharad Pawar praise Shiv Sena in NCP anniversary programme

Related Posts