ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

by nagesh
shiv bhojan thali yojna failed in sindhudurg says bjp

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण यादरम्यान गोरगरीबांची अडचण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारकडून ‘शिवभोजन थाळी’ची (shiv bhojan thali) व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, याच मुद्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘शिवभोजन योजना केवळ दिखाऊ आहे. त्यामुळे आता लवकरच या योजनेची पोल-खोल करणार’ असल्याचे म्हटले आहे.

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गोरगरीबांसाठी शिवभोजन थाळी shiv bhojan thali योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत अनेकांना फायदा झाला. त्यानंतर आता ‘ब्रेक दी चेन’ या नियमांतर्गत सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यावरून भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई यांनी टीका केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसत आहे. जिल्ह्यात बारा केंद्रे सुरू असताना वेंगुर्ले तालुक्यातील शिवभोजन केंद्र हे फक्त चार महिने सुरु होते. गेल्या लॉकडाऊन काळातच ते बंद पडले आहे. त्यामुळे सध्या शिवभोजन योजना केवळ दिखाऊ ठरत आहे. योजनेतील शिवभोजन लाभार्थींची दर दिवसाची आकडेवारी यादी ही फसवी असल्याने या योजनेची पोल-खोल करणार आहे’.

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

तसेच शिवभोजन थाळी shiv bhojan thali ही योजना बचत गटांना प्रत्यक्ष रोजगार मिळणारी आहे. तसेच कष्टकरी व मजूर यांना या योजनेचा फायदा होत होता. मात्र, ही शिवभोजन योजना येथील महिला बचत गटांना देणे आवश्यक होते. मात्र, तहसीलदार व आरोग्य विभाग कँटिनमध्ये शिवभोजन थाळी योजना सुरु आहे. हॉटेल व्यावसायिकांनी ही शिवभोजन थाळी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.

Also Read :

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

Related Posts

Leave a Comment