IMPIMP

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

by pranjalishirish
shiv sena criticized bjp over politics behind amit shah sharad pawar meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  Sharad Pawar आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित गुप्त भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवरुन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधाला आहे. देवेंद्र फडणवीसांचे सरकार असताना साम-दाम-दंड भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. यामधून काय साध्य होणार ? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करुन महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत, असा आरोप शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे. ‘पित्त का खवळतंय ?’ या शिर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या शरद पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार Sharad Pawar  लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपने गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

शरद पवार Sharad Pawar  आणि अमित सहा यांच्यात गुप्त खलबते झाल्याच्या अफवेने दोन दिवस चर्चा तर होणारच. शरद पवार हे शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथे खास विमानाने गेले. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल होते. एका बड्या उद्योगपतीच्या घरी ते मुक्कामाला होते. हे बडे उद्योगपती कोण हे देखील उघड आहे. त्याच रात्री अमित शहा अहमदाबाद येथे पोहचले व शहा-पवारांत देशभरात गाजत असलेली गुप्त भेट झाली. त्या गुप्त भेटीत म्हणे गुप्त खलबतेही झाली. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. अहमदाबादेत भेट झाली म्हणजे दोन नेत्यांचे राज्यातील सरकारबाबत काय ते नक्कीच ठरले असणार व ठाकरे यांचे सरकार दोन दिवसांत गेलेच म्हणून समजा, असा दावा काही लोकांनी केला. मुळात सत्य असे आहे की, अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट, गुप्त खलबते झाल्याचा साफ इन्कार पवारांकडून करण्यात आला.

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

ज्या उद्योगपतीच्या घरी ही भेट वगैरे झाल्याचे सांगितले जाते त्यांची गुप्त घरे दिल्ली-मुंबईतही आहेत. ही गुप्त भेट अहमदाबादपेक्षा मुंबई-दिल्लीतच अधिक सोयीची झाली नसती का ? पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वत: अमित शहा यांनी पतंग उडवले. पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की ‘अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात’.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरुन इतके वर गेले की, मोदी-शहा, नड्डा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असे सांगून आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार आलेच अशा थाटात काहीजण वावरु लागले. शरद पवार यांनी शहांची भेट घेतली की नाही हा प्रश्न सोडा, पण विरोधी पक्ष सत्तेसाठी कसा उतावीळ होऊन वळवळ करीत आहे, ते या निमित्ताने दिसले. मुळात राजकारणात आता काहीच गुप्त वगैरे नसते. जे गुप्त असते सगळ्यांत आधी सार्वजनिक होते, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

Related Posts