IMPIMP

‘ते’ पद पुन्हा शिवसेनेकडेच, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सोपवली संदीपान भुमरेंवर महत्वाची जबाबदारी

by Team Deccan Express
shiv sena leader sandipan bhumre gets guardian ministerialship yavatmal district

यवतमाळ : सरकारसत्ता ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे पालकमंत्री पद रिक्त झाल्याने या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांकडून लॉबिंग सुरु होते. अखेर आज (शुक्रवार) जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी रोहयो, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे sandipan bhumre यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे पालकमंत्री पद पुन्हा शिवसेनेकडे कायम राहिले आहे.

राष्ट्रवादीचा राम कदमांवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘मुली उचलून आणण्याची भाषा करणारे, साधूंसाठी आंदोलन करतायेत’

पूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे होते. मात्र, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर दबाव आणला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे नव्या पालकमंत्र्याचा शोध सुरु होता. एकनाथ शिंदे, अनिल परब, शंभूराजे देसाई यांच्यासह इतर काही नावे चर्चेत होती. तसेच शिवसेनेच्या नेत्यांकडून देखील लॉबिंग सुरु होते. अखेर आज संदीपान भुमरे sandipan bhumre यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

Belgaum : राष्ट्रवादीचा महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा ! ‘फडणवीस दिल्लीकरांना खुश करण्यात व्यस्त’; जयंत पाटलांचा टोला

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांनी दिले जावे यासाठी काँग्रेसने प्रयत्न चालवले होते. 1 मे महाराष्ट्र दिनापूर्वी पालकमंत्री घोषित होतील असे सांगितले होते. अखेर आज त्याला मुहूर्त सापडला. औरंगाबाद येथील शिवसेना नेते, रोहयो मंत्री संदीपान भुमरे sandipan bhumre यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याच्या पालमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री हे पद शिवसेनेकडेच राहिले आहे.

Also Read :

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts