IMPIMP

Shiv Sena MLA Shahajibapu Patil | ‘मताला प्रत्येकी 3 हजार रुपये अन् मटण वाटून लढवली होती निवडणूक; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात चर्चा

by nagesh
Shiv Sena MLA Shahajibapu Patil | mutton and 3000 rupees paid for per vote in 1998 pandharpur sangola sugar factory election said shiv sena mla shahajibapu patil

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन  Shiv Sena MLA Shahajibapu Patil | शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मताला प्रत्येकी 3 हजार रुपये वाटप केलं असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. चक्क आमदाराने असं बोलल्याबाबत राजकारणात चर्चासत्र सुरु आहे. सांगोला (Sangola ) सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा कार्यक्रम रविवारी (17 ऑक्टोबर) रोजी आयोजित केला होता. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील (Shiv Sena MLA Shahajibapu Patil) यांनी कबूल केलं आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पाटील यांनी भाषण करतेवेळी मतदारांना मटण आणि पैसे वाटप केल्याचा गौप्यस्फोट केला. चक्क आमदाराने जाहीर कार्यक्रमात केलेल्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय नेते कशाप्रकारे निवडणुकीत पैशाची उधळआपट करतात आणि मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करतात हे पुन्हा एकादा पुढं आलं आहे. दरम्यान, त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 1998 मध्ये सांगोला साखर कारखान्याची निवडणूक होती. गणपतराव देशमुख (Ganapatrao Deshmukh), माजी आमदार दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांच्यासोबतच इतरही नेत्यांनी आपले पॅनल निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत मला वाळीत टाकलं असं वाटलं. तेव्हा मताला 3 हजार रुपये दिले मी उघड सांगतो. 3 हजार रुपये मताला वाटून एकूण 57 हजार रुपये वाटून टाकले होते. तसेच मटणाच्या पार्ट्याही दिल्या होत्या. असे ते म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, पैसे वाटप केल्यानंतर सर्व पॅनल पराभूत झाले आणि आपण निवडून आलो.
त्यानंतर अखेर आमदारसाहेबांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलं.
सभासदत्व टिकावे यासाठी दिलेले योगदान आहे असं सांगत साखर कारखाना निवडणुकीत पैसे वाटपाचा संबंध नाही, असे ते म्हणाले.
साखर कारखान्याच्या उभारणी पूर्वी ही निवडणूक लागली होती.
या निवडणुकीत कारखान्याचे 3 हजार सभासद होते.
या सर्व सभासदांचे सभासदत्व कायम रहावे यासाठी हे योगदान दिले होते. असं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Shiv Sena MLA Shahajibapu Patil | mutton and 3000 rupees paid for per vote in 1998 pandharpur sangola sugar factory election said shiv sena mla shahajibapu patil

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Town Planning | राज्यातील अनधिकृत बांधकामांना कम्पाऊंडिंग चार्जेस आकारून ‘अभय’; नगरविकास विभागाने काढला आदेश

Hot Water Advantages | गरम पाण्यात मिसळून ‘या’ गोष्टींचे करा सेवन; पचन होईल व्यवस्थित, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Related Posts