IMPIMP

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

by pranjalishirish
shiv sena spokesperson announced sanjay raut arvind sawant bhaskar jadhav also included

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- सचिन वाझे प्रकरणामध्ये विरोधकांनी शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर तोंडसुख घेतलं आहे. विरोधकांनी शिवसेना Shiv Sena  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. विरोधकांकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत असताना पक्षाची बाजू केवळ मोजक्याच लोकांनी मांडली. यामध्ये संजय राऊत हे परखडपणे पक्षाची बाजू मांडत विरोधकांना प्रत्युत्तर देताना दिसत होते. मात्र इतरांकडून असे होताना दिसत नव्हते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या  Shiv Sena प्रवक्त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अन्य प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये खासदार प्रियंका चतुर्वेदी, परिवहन मंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनिषा कायंदे यांची नावे आहेत.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

तसेच महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे, या नेत्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेच्या Shiv Sena  मध्यवर्ती कार्यालयातून नवीन प्रवक्त्यांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

Related Posts