IMPIMP

Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची मनसेवर जोरदार टीका

by Team Deccan Express
Raj Thackeray | raj thackeray reaction on sammed shikharji row in jharkhand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena And NCP on MNS | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून (Ayodhya Tour) चांगलेच राजकारण तापले आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनी हा दौरा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. त्यावरही आता शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीने (NCP) जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्हाला विचारले असते तरी राज यांना मदत केली असती, असा खोचक टोला राज ठाकरे यांना लगावला आहे. (Shivsena And NCP on MNS)

संजय राऊत म्हणाले की, ”15 जूनला अयोध्येला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) जाणार आहेत. इतर पक्षाचे कार्यक्रमही तेथे होते. त्यांनी ते रद्द केले. त्यांना जर 5 जूनच्या कार्यक्रमासाठी काही सहकार्य हवे असते तर ते आम्ही नक्कीच दिले असते. शिवसेनेला मानणारा उत्तर प्रदेशमध्ये मोठा वर्ग आहे. काहींना तीर्थयात्रेला जायचे त्यावेळी ते विचारतात की, काही मदत करू शकता का? अशा वेळी आम्ही त्यांना मदत करत असतो. शिवसेनेचा एक मदत कक्ष तेथे आहे. दर्शनासाठी कोणाला अडचण आली तर राजकारण बाजूला ठेऊन त्यांना आम्ही मदत करतो, ” असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यांच्या बाबतीत भाजपने (BJP) असे करणे चुकीचे आहे. भाजप प्रत्येकवेळी राजकीय फायद्यासाठी राज्यातील नेत्यांचा वापरत करून घेत असून त्यातीलच हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. (Shivsena And NCP on MNS)

तूर्तास दौऱ्याचा भोंगा बंद..

सोशल मीडियावरील राज ठाकरे यांच्या पोस्टची नक्कल करत राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) टीका केली आहे. ‘’तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा, यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच…’अशा आशयाची पोस्ट राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केली आहे.

‘चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!’

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी एक पोस्ट केली आहे त्यात ते म्हणाले, ”तूर्तास स्थगितीचा अर्थ म्हणजे पुढे होईल असा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जो नेता अंगावर घेतो, राष्ट्रहितासाठी जो नेता पंतप्रधानांवरही टीका करताना कचरत नाही, असा नेता एका खासदाराच्या बडबडण्याने निर्णय बदलेल का? तूर्तास स्थगितीचा अर्थ लावताना विरोधकांनी नवनवीन राजकीय शोध लावू नये. पुण्यात सर्वांचा हिशोब चोख केला जाईल.” असेही त्यांनी म्हंटले आहे.

Web Title : Shivsena And NCP on MNS | Shivsena leader and MP sanjay raut and ncp ridiculed
raj thackeray over ayodhya visit postponed mns replied too

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts