IMPIMP

जळगावच्या निकालावर शिवसेना म्हणते – ‘यापुढं देखील असे अनेक…’

by bali123
shiv sena attacks bjp over jalgaon mayor election result

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Shivsena | सत्ता गेली की, अक्कल जाते, अक्कल गेली की, भांडवल जातं, भांडवल गेलं की, कुंपणावरचे कावळे उडून जातात. सध्या भाजप याचा अनुभव घेत आहे असं म्हणत शिवसेनेनं  Shivsena भाजपवर जोरदार टीका केली आहे. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील असा इशारा देखील शिवसेनेनं भाजपला दिला आहे.

…म्हणून काही गोष्टी समोर आणणं गरजेचं म्हणत रोहित पवारांनी साधला जावडेकरांवर ‘निशाणा’

शिवसेनेनं ( Shivsena ) सत्ताधारी भाजप (Bharatiya Janata Party – BJP) ला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत (Jalgaon Municipal Corporation) भगवा फडकवला आहे. भाजपचे नगरसेवक फुटल्यानं शिवसेनेला सत्तापरिवर्तन करण्यात यश आलं. सांगलीनंतर आता जळगाव महापालिकेतील सत्ताही भाजपनं गमावली आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून जळगावच्या निकालावर भाष्य केलं आहे. यावेळी शिवसेनेनं भाजपवर सडकून टीका केली आहे.

जयंत पाटील यांना मिळणार गृहमंत्रिपद?, चर्चांना उधाण

सामनाच्या अग्रलेखात काय लिहिलंय ?

सामनाच्या अग्रलेखात लिहिलंय की, भाजपचा फुगा एकापाठोपाठ फुटू लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळींनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची आणि जळगावावरील वर्चवस्वाची चुणूक दाखवली आहे अशा शब्दात शिवसेनेनं खडसेंचं कौतुकही केलंय.

RSS मध्ये मोठा बदल ! भैय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रेय होसबोले, जाणून घ्या नवीन सरकार्यवाह यांच्याबाबत

‘सत्ता गेली की, अक्कल जाते, अक्कल गेली की, भांडवल जातं, भांडवल गेलं की, कुंपणावरचे कावळे उडून जातात’

अग्रलेखात पुढं लिहिलंय की, महाराष्ट्रात 5 वर्षे भाजपची सत्ता होती. त्या सत्तेतून पैसा व पैशांतून सर्व स्तरांवरील सत्ता विकत घेण्यात आल्या. पैसे फेकले की, सर्व विकत मिळतं हा नवा सिद्धांत भाजपनं रूजवला. परंतु महाराष्ट्रात 105 आमदार निवडून येऊनही भाजपला राज्याची सत्ता मिळवता आली नाही. सत्ता गेली की, अक्कल जाते, अक्कल गेली की, भांडवल जातं, भांडवल गेलं की, कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. त्यातू त्यांना शहाणपण आलं तर उत्तमच असं म्हणत शिवसेनेनं भाजपला चिमटा काढला आहे.

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

नष्ट झालंय लोकांच्या मनातलं भय

महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यापासून येथील लोकांच्या मनातलं भय नष्ट झालं आहे.
त्यामुळं लोक निर्भय बनून मतदान करत आहेत.
ईडी, आयकर विभागाचं भय सामान्य माणसांना असण्याचं कारण नाही.
आतापर्यंत हे भय दाखवूनच भाजपनं राजकीय स्वार्थ पाहिला.
पोलीस यंत्रणेचा वापर करून ग्रामपंचायतीपासून तर विधानसभेपर्यंतच्या निवडणुका जिंकल्या.
हे भय आता उरलं नाही म्हणून लोक मुक्तपणे संचार करू लागले आहेत असा दावाही शिवसेनेनं केलाय.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षांत वाढली चक्क 1985 टक्क्यांनी !

Related Posts