IMPIMP

मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘हा तर धक्कादायक विनोद !’

by bali123
Uddhav Thackeray | uddhav thackeray will stand against narendra modi for 2024 election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – केंद्रीय अर्थमंत्रालयानं बुधवारी (दि 31 मार्च) रात्री सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील अर्थात पीएफसह अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश काढला होता. यानंतर अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना धक्का बसला. त्यावरून टीकाही झाली. यानंतर काही तासात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी सकाळीच याबाबत खुलासा करत सारवासारव केली आणि हा आदेश चुकीनं काढला गेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मोदी सरकारनं घेतलेल्या यु टर्ननंतर आता त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. अनेकांनी या भूमिकेवरून आणि चुकीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. अशात शिवसेनेनं shivsena देखील आता या मुद्द्यावरून भाष्य करत मोदी सरकारला फटकारलं आहे.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

‘हा तर धक्कादायक विनोद म्हणावा लागेल, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते ?
शिवसेनेनं shivsena सामनाच्या लेखातून यावर भाष्य केलं आहे. शिवसेनेनं म्हटलं आहे की, सामान्य जनतेला तुम्हाला दिलासा देता येत नसेल तर देऊ नका, पण त्यांच्यावर व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका. पुन्हा हा निर्णय नजरचुकीनं जाहीर झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात. हा तर धक्कादायक विनोद म्हणावा लागेल. एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते ? ती देखील प. बंगालसारख्या राज्यातील निवडणुका सत्ताधारी पक्षानं, प्रामुख्यानं पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या असताना ? अर्थमंत्री मॅडम तुम्ही नजरचूक दुरुस्त केली हे ठीक, पण जो बूंद से गयी त्याचं काय ? पुन्हा निवडणुका संपल्यानंतर अर्थमंत्र्यांची नजरचूक जनतेच्या खिशावर असं होणारच याची काय खात्री ? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

‘कर्जबुडव्या उद्योगपतींना मोकळं सोडायचं आणि कष्टाच्या कमाईची गुंतवणूक करणाऱ्या सामान्यांचे खिसे कापायचे’
शिवसेना shivsena पुढं म्हणते, अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपात मागे घेण्यामागेही 5 राज्यातील गणित आहेच. जनतेला हा आता दिलासा वगैरे असला तरी ही उठाठेव करण्याची गरज होती का ? बरं हे व्याजदर खूप आवाच्या सवा आहेत असंही नाही. वर्षागणिक ते कमीच होत आहे. त्यावरही तुम्ही दांडपट्टा चावलणार असाल आणि सामान्य माणसाच्या हालाखीत भर घालणार असाल तर कसं व्हायचं ? तिकडे कर्जबुडव्या उद्योगपतींना मोकळं सोडायचं आणि इकडे इमानेइतबारे सरकारच्याच अल्पबचत योजनांत कष्टाच्या कमाईची गुंतवणूक करणाऱ्या सामान्यजनांचे खिसे कापायचे. बँकांचं कित्येक हजार कोटींचे बुडीत कर्ज वसूल करणं राहिलं बाजूला, अल्पबचत योजनांवरील जेमतेम 5-6 टक्क्यांच्या व्याजावर डल्ला मारायचा. पुन्हा या धोरणात ना अर्थकारण आहे ना राजकारण. असेलच तर हात दाखवून अवलक्षणच म्हणावं लागेल.

Also Read : 

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

Related Posts