IMPIMP

Shivsena | शिवसेनेकडून पुन्हा एकदा स्पष्टोक्ती ! म्हणाले – ‘सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो’

by omkar
Shivsena

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – व्यक्तिगत नात्यागोत्यात सत्ता हाच फक्त नात्यांचा धागा नसतो.
सत्तेत नसलो याचा अर्थ असा होत नाही की नातीही तुटली. राजकीय मतभेदांमुळे व्यक्तिगत नात्यातील दुरावा वाढत जातो असे होत नाही. शिवसेनेने (Shivsena) नेहमीच ही नाती सांभाळली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली. त्यामुळे हि भेट जशी राजशिष्टाचाराचा भाग होती तशीच व्यक्तिगत नात्याचीही होती.
त्यामुळे यामध्ये जर कोणाला राजकारण दिसते ते धन्य होत, अशा शब्दात भूमिका स्पष्ट करत शिवसेनेने (Shivsena) सामनातून विरोधकांना टोला लगावला आहे.

पायी वारीला परवानगी द्या, अन्यथा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल; याला सरकार जबाबदार असेल, वारकरी आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा चा वेगळा निकाल दिल्यापासून महाराष्ट्रातील जातीय राजकारणास बहार आली आहे.
रस्त्यावर उतरून मराठा संघटनांनी आंदोलन करण्याचे रणशिंग फुंकले आहे.
विनायक मेटे वगैरे नेत्यांनी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनीही ‘आता माघार नाही’ असा बाणा दाखवत मराठा समाजासाठी लढण्या-मरण्याची भाषा केली.
भाजपनेही यामध्ये उडी मारत संभाजीराजे यांनी आंदोलन केले तर त्या आंदोलनात आपण सहभागी होणारच, असे काही नेत्यांनी जाहीर केले.
त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असले तरी आरक्षणाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रालाच आहे.
असे असूनही काही लोक दिल्ली ऐवजी मुंबईत बसून लोकांची डोकी भडकवत आहे.
हे सर्व असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट दिल्लीच गाठली व मोदींनाच सांगितले, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवा असे सांगितले.
मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांची गोची झाली आहे असे म्हणत सेनेनं भाजपवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे ‘महाराष्ट्र हिताच्या बाबतीत कुणाचीही व कसलीही भीडभाड ठेवणारे नेते नाहीत.
महाराष्ट्राच्या वाट्याचे आहे ते मिळालेच पाहिजे हे सांगणारे मुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीतही स्पष्टपणे भूमिका मांडलीच असेल.
महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले हे यासाठी महत्त्वाचे की, इतर ठिकाणी जो राज्य-केंद्र संघर्ष सतत सुरू आहे त्याची लागण महाराष्ट्राला लागलेली नाही’ असंही सेनेनं म्हटलं.
‘महाराष्ट्राचे ना दिल्लीशी भांडण ना केंद्राशी संघर्ष. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बांधिलकी विकास व जनसेवेशी आहे.
पंतप्रधानांचा आदर मुख्यमंत्री ठाकरे यांनी नेहमीच राखला. मंगळवारीही विनम्रपणे त्यांनी राज्याचे प्रश्न पंतप्रधानांसमोर ठेवले.
पंतप्रधानांनीदेखील सर्व मुद्दे शांतपणाने ऐकून घेतले. ते आता हळूहळू मार्गी लागतील ही आशा बाळगायला हरकत नाही’, असा विश्वास सेनेनं व्यक्त केलं.

‘सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सांगितले. हे नाते काय व कसे याचा सखोल अभ्यास यापुढे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी करीत राहावा.
व्यक्तिगत नात्यागोत्यात सत्ता हाच फक्त नात्यांचा धागा नसतो.
सत्तेत नसलो याचा अर्थ असा होत नाही की नातीही तुटली. राजकीय मतभेदांमुळे व्यक्तिगत नात्यातील दुरावा वाढत जातो असे होत नाही.
पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीने महाराष्ट्राचे केंद्रातील प्रश्न मार्गी लागोत, अशी अपेक्षाही शिवसेनेनं (Shivsena) अग्रलेखातून व्यक्त केली आहे.

Also Read:

पुन्हा एकदा राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ! मागील 2 दिवसांपासून आमदारांच्या विविध बैठका सचिन पायलट यांच्या घरात सुरू

Narendra Modi | BJP चा मोठा निर्णय ! राज्यांतील विधानसभा निवडणुकामध्ये आता पीएम मोदींचा चेहरा वापरण बंद

Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले, जाणून घ्या आजचे नवे दर 

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

Related Posts