IMPIMP

Sanjay Raut : ‘वाझे प्रकरणामुळं सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, सरकार पडणं शक्य नाही’

by bali123
shivsena leader sanjay raut on sachin vaze case claims state government is stable

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – एका एपीआयमुळं सरकार पडणार नाही असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणावर भाष्य केलं आहे. राज्य मंत्रिमंडळात सचिन वाझे प्रकरणावर काहीही घडामोडी घडत नाहीयेत. सचिन वाझे प्रकरणामुळं सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही. पुढील साडेतीन वर्षे सरकार पडणं शक्य नाही असं राऊत म्हणाले आहेत.

‘सचिन वाझे प्रकरणामुळं सरकार पडेल, सरकार अस्थिर या भ्रमातून बाहेर पडावं’
संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, सचिन वाझे प्रकरणामुळं सरकार पडेल किंवा सरकार अस्थिर झालं या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं. एका एपीआयमुळं सरकार पडणार नाही. सरकार पुढची साडेतीन वर्षे चितपट करणं कुणालाही जमणार नाही. या प्रकरणाचा एनआयए आणि एटीएस तपास करत आहेत. केंद्रीय संस्था तपास करत असताना त्यात हस्तक्षेप करणं योग्य नाही. मात्र त्यावर आमचं लक्ष आहे. कॅबिनेट बैठका सचिन वाझे प्रकरणामुळं होत नाहीयेत. सचिन वाझे प्रकरण ही लहान गोष्ट आहे असंही राऊत यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

‘सचिन वाझे शिवसेनेशी निगडीत होते, मात्र…’
पुढं बोलताना राऊत म्हणाले, सचिन वाझे शिवसेनेशी निगडीत होते. मात्र एखादी व्यक्ती आधी शिवसेनेशी संबंधित असेल तो काय गुन्हा नाही. शिवसेना बंदी घातलेली संस्था नाही. प्रत्येक मराठी माणूस कधी ना कधी शिवसेनेशी संबंधित असतो.

‘हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील निर्णय, त्यावर मी बोलणं योग्य नाही’
राज्यात सुरू असणाऱ्या खातेबदलांच्या चर्चावर बोलताना राऊत म्हणाले, हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील निर्णय असतो. परंतु सरकार तीन पक्षाचं असल्यानं तीन पक्षाचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतात. त्यावर मी बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

‘ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तिथं जाऊन कारवाई करण्याचा काहींना छंद’
राऊत असंही म्हणाले, गेल्या काही दिवसात अनेक प्रकरणात पाहिलं गेलं आहे की, एनआयए किंवा केंद्रीय संस्थांना अटकेची घाई असते. ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तिथं जाऊन कारवाई करण्याचा छंद काही लोकांना जडला आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणातही आपण ते पाहिलं आहे. ईडी (ED) प्रकरणातही अनेकदा पाहिलं आहे. महाराष्ट्र, प. बंगाल, झारखंड या राज्यात अशा घटना घडत आहेत. त्यामुळं याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही असंही त्यांनी नमूद केलं.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर ! 17 एप्रिलला होणार मतदान, राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

Related Posts