IMPIMP

देशानंही ‘महाराष्ट्र मॉडेल’ व मुख्यमंत्र्यांसारखं काम करावं : खा. संजय राऊत

by Team Deccan Express
shivsena mp sanjay raut on maharashtra cm uddhav thackeray central government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती बिकट होत चालल्यामुळे कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स मिळवताना रुग्णांच्या नातेवाइकांची दमछाक होताना पहायला मिळत आहे. मात्र, महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत sanjay raut यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करुन दाखवलं म्हणत संजय राऊत यांनी कौतुक केले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

RSS स्वयंसेवकाने स्वत:चा बेड त्याग करत दिला दुसऱ्याला म्हटले, ‘मी जीवन जगलोय…

संजय राऊत sanjay raut म्हणाले, दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणेच चालावे लागेल असे सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत त्या पद्धतीने देशाला काम करावं लागेल असेही राऊत म्हणाले. मुंबईत रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 24 तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरु आहे त्याची माहिती घेत आहेत. महाराष्ट्रात लवकरच परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहेत, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसचा नवाब मलिकांना टोला, म्हणाले – ‘श्रेय घेण्यासाठी घोषणा करणे योग्य नाही’

देशाने महाराष्ट्राचे अनुकरण करावे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सूत्रं हातात ठेवून 24 तास काम करत आहेत. कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, ते पाहिले. महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी होण्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांनाच दिले पाहिजे. आता दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणेच चालावे लागेल. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे, असा टोला राऊत sanjay raut यांनी लगावला.

देश 20 वर्षे मागे गेला
कोरोना संकटामुळे देश 20 वर्षे मागे गेला आहे. देशातील स्थिती गंभीर आहे, काही राज्यांनी सुरुवातीपासून चाचण्या केल्या नाहीत. अचानक लाट उसळल्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथून आकडेवारी येयला लागली आहे. देशातील अनेक व्यवस्था कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी सघर्ष करावा लागले, असे राऊत sanjay raut यांनी म्हटले.

हा कलंक दूर करावा लागेल
आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेशी चांगला मुकाबला केला, दुसऱ्या लाटेत थोडी गडबड झाली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु असून आपण सर्वांनी सकारात्मकपणे विचार केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बदनामी होत असल्यास मान्य आहे. पण हा कलंक दूर करावा लागेल, असे आवाहन संजय राऊत sanjay raut यांनी केले.

देवेंद्र फडणवीसांच्या सूचना उत्तम आहेत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहेत, असे राऊत sanjay raut यांनी म्हटले.

‘आदित्यजी, ‘आपल्याला झेपतील अन् समजतील अशाच विषयावर ट्विट करा’; भाजपचा टोला

लॉकडाऊनचा परिणाम दिसतोय
लॉकडाऊन वाढण्याचे संकेत असल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मुंबईसारख्या ठिकाणी लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आहे. रुग्णसंख्या निम्म्यावर आली आहे. जर रुग्णसंख्या कमी होत असेल तर काही कठोर निर्णय सरकारने घेतले तर कोणतेही राजकारण न करता सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, असेही संजय राऊत sanjay raut यांनी म्हटले.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts