IMPIMP

बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान

by pranjalishirish
Pegasus | india not safe hands pm narendra modi says sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्यात kumbh mela  झालेल्या गर्दीमुळे उत्तराखंड आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. शाहीस्नानासाठी झालेल्या गर्दीनंतर 102 साधू व भाविक कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. ‘महाराष्ट्रात इतर राज्यांमधून लोक येत असून, तिथे नियंत्रण नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

देशात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, महाकुंभमेळ्यात kumbh mela  मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामध्ये अनेकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडले. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात इतर राज्यांमधून लोक येत असून, तिथे नियंत्रण नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे. हरिद्वारमध्ये लाखो लोक एकत्र आले. त्यावर नियंत्रण ठेवायला हवे होते. मात्र, महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा करण्यावर मुख्यमत्र्यांनी नियंत्रण आणले आहे. लोकांना आवडत नसले तरीही सरकारने केले आहे.’

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

कोरोनाविषयी राज्य सरकारने जी काही पावले उचलली त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकार, प्रशासन, आरोग्य व्यवस्था देशातील सर्वोत्तम आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे ही लढाई लढत आहोत. तसेच मला जे काही चित्र दिसतंय त्यानुसार महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर असा निर्णय लावला गेला तरी आश्चर्य वाटणार नाही’.

Read More : 

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

Related Posts